वाहन चालक परवाना स्मार्ट कार्ड मध्ये रूपांतरण करण्याकरिता 15 सप्टेंबर पर्यंत मुदत ; जाणून घ्या सविस्तर !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ smart card licence] वाहन चालक परवाना स्मार्ट कार्ड मध्ये रूपांतर करण्याकरिता  दिनांक 15 सप्टेंबर पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे . या संदर्भात प्रादेशिक परिवहन कार्यालय मुंबई मार्फत अधिकृत माहिती प्रसारमाध्यमांशी देण्यात आलेली आहे .

यानुसार ज्या वाहन चालकांनी आतापर्यंत मानवी हस्ते अनुज्ञप्ती प्राप्त करून घेतलेले आहेत , अशा चालकांनी दिनांक 15 सप्टेंबर 2024 पर्यंत वाहन चालक परवाना संगणक प्रणालीच्या माध्यमातून स्मार्ट कार्डमध्ये रूपांतरण करून घेण्याचे आव्हान राज्य शासनाच्या प्रादेशिक परिवहन खात्याचे अधिकारी श्री. भरत कळसकर यांच्याकडून करण्यात आली आहेत .

दिनांक 15 सप्टेंबर 2024 नंतर प्राप्त होणाऱ्या अर्जाचे स्मार्ट कार्ड मध्ये रूपांतर केले जाणार नसल्याचे , यावेळी परिवहन अधिकारी , मुंबई यांच्या मार्फत नमूद करण्यात आली आहे , मुंबई मध्य प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे ( building Constraction) त्याचबरोबर सदर कार्यालयाच्या भागातील इमारतीचे बांधकाम सुरु होत असल्या , कारणाने वाहन चालक धारकांनी दिनांक 15 सप्टेंबर 2024 पर्यंत सदर कार्यालयाच्या माध्यमातून आपले वाहन चालक परवाना , स्मार्ट कार्ड  (Smart Card ) मध्ये रूपांतर करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण करावी असे , नमूद करण्यात आलेले आहेत .

यामुळे वाहन चालक धारकांनी सदर बाबींचा विचार करून दिनांक 15 सप्टेंबर 2024 पर्यंत वाहन चालन परवाना स्मार्ट कार्ड मध्ये रूपांतर करून घ्यावेत , असे नमूद करण्यात आलेली आहे.

Leave a Comment