@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ this election get more benifit to sharad pawar parti ] : यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये नेमके कोणत्या पक्षाला मतदान करावे यावर मतदार अधिकच संभ्रमात सापडले आहेत . कारण राज्यामध्ये तब्बल 06 मोठे पक्ष निर्माण झालेले आहेत . यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडले आहेत , तसेच शिवसेना पक्षाचे दोन गट पडले आहेत . यामुळे मतदारांना नेमके कोणत्या पक्षाला मत करायचे याबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे .परंतु यंदाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मतदारांची सर्वाधिक पसंती असल्याचे , मीडिया रिपोर्ट नुसार समोर येत आहे .
सध्याच्या लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार गटास चांगले यश मिळाले आहे , यामुळेच यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील शरद पवार गट अधिकच प्रभावशाली ठरण्याचा अंदाज तज्ञांकडून व्यक्त केला जात आहे .पश्चिम महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचा वर्चस्व राहण्याचा अंदाज वर्तवला जात आहे , तर कोकणामध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गट व उद्धव ठाकरे गट एकमेकात चुरशीचा सामना करतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे .
तर मराठवाड्यामध्ये यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटास सर्वाधिक फायदा होण्याची शक्यता आहे . कारण यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचे आंदोलन मनोज जरांगे पाटील थेट सहभाग घेणार असल्याने , काही जागावर शरद पवार गटास मनोज जरांगे पाटील सक्रिय पाठिंबा देतील असा अंदाज असल्याने , मराठवाड्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटास सर्वाधिक फायदा होण्याची शक्यता आहे .
त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रामध्ये शरद पवार गटाचा वचक कायम असून , पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा मध्ये शरद पवार गटास चांगला फायदा होण्याची शक्यता आहे .विद्यमान सरकारने विदर्भामध्ये अधिक योजना तसेच सोयी सुविधा मोठ्या प्रमाणात दिल्याने , विदर्भात भारतीय जनता पार्टीला (BJP ) चांगला प्रतिसाद मिळू शकतो . म्हणजेच यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे सर्वाधिक उमेदवार विदर्भातून निवडून येण्याची शक्यता आहे . या खालोखाल मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पार्टीला चांगला प्रतिसाद मिळू शकतो .
- शेअर मार्केटमध्ये तेजी कधी येणार ? जाणून घ्या मार्केट तज्ञ , मोतीवाल ओसवाल यांचे भविष्य !
- सरकारी कर्मचाऱ्यांना 40 दिवसांच्या अतिरिक्त वेतन बोनससह , वाढीव भत्ताचा लाभ !
- शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट ; मार्केट आणखीन घसरण्याचा अंदाज !
- राज्यात महायुती सरकार राबवित असणाऱ्या काही महत्त्वपूर्ण नवीन योजना ; सत्तांतर झाल्यास बंद पडण्याची भीती ..
- पुढील 48 तासात राज्यातील “या” जिह्यात , वाऱ्यासह पावसाची शक्यता !