@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : भारतामध्ये तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका कॉमेडी शो म्हणून लोकप्रिय आहे .यामध्ये रोशन सिंग सोढी या नावाने भूमिका साकारणारा अभिनेता गुरुचरण सिंग याची भूमिका मोठी धमाकेदार आहे .
हाच गुरुचरण सिंग अचानक दिल्ली येथून बेपत्ता झाल्याने , सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे . हा गुरुचरण सिंह दिनांक 26 एप्रिल रोजी बेपत्ता झाला असल्याची बातमी मिडिया समोर आली . त्यांचे वडील हारगीत सिंग पोलिसांना तक्रार देत दिनांक 22 एप्रिल पासूनच गुरुचरण बेपत्ता असल्याची सांगण्यात आले , पोलिसांकडून अपहरणाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास करण्यात येत आहे .
गुरुचरणला दिल्ली विमानतळ येथून दिनांक 22 एप्रिल रोजी मुंबई येथे येणार होते , परंतु गुरुचरण दिल्ली विमानतळावर गेलाच नसल्याची माहिती समोर येत आहे , यावेळी दिल्लीमधील पालमसह विविध भागातील CCTV कॅमेरे पाहण्यात आले , यामध्ये सदर गुरुचरण सिंग पायी चालताना दिसला, तर दिल्ली येथील एका ATM मधून 7,000/- रुपये काढल्याचे समजले .
त्याचे मोबाईल डिटेल्स तपासल्याच्या नंतर पोलिसांसमोर अनेक गोष्टींचे गुड समोर आले आहे , याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 24 एप्रिल पर्यंत सदर अभिनेता दिल्लीमध्येच होता .त्यानंतर त्याचा मोबाईल बंद झाला , व दिनांक 24 तारखेला त्याचे शेवटचे लोकेशन पालम येथील त्याच्या घरापासून सुमारे दोन ते तीन किलोमीटर अंतरावर उपस्थित असल्याचे दिसून आले.
त्याच्या वडिलांकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्याची आई दीर्घ आजारातून बरी झाली असून, गुरु चरणसिंग लवकरच लग्न करणार असल्याची माहिती दिली . या काळामध्ये तो आर्थिक अडचणीचा सामना करत असल्याची देखिल माहिती दिली आहे .
- राज्य कर्मचाऱ्यांना 3 वर्षातुन 10 दिवस मिळते या कामासाठी पगारी रजा ; जाणून घ्या वित्त विभागाचा शासन निर्णय !
- जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकरीता महत्वपुर्ण राजपत्र निर्गमित दि.18.07.2025
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय ; संसदेत दिली माहिती !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !