@marathiprasar वंदना पवार प्रतिनिधी [ Rain warning for these districts of the state on March 29th and 30th ] : राज्यातील या जिल्ह्यांना दिनांक 29 व 30 मार्च रोजी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे , याबाबतचा सविस्तर हवामान अंदाज पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात..
राज्यात सध्या कडक तापमान असल्याने , पाण्याचे बाष्पीभवर मोठ्या प्रमणात वाढल्याने , अवकाळी पावसाची निर्मिती होते आहे . यामुळे दिनांक 29 व 30 मार्च रोजी काही जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे .
यामध्ये दिनांक 29 व 30 मार्च रोजी राज्यातील कोकण किनारपट्टीवरील जिल्हे यात रत्नागिरी , सिंधुदुर्ग या जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिण्यात आलेला आहे .या कालावधीत कोकण भागातील ठाणे , मुंबई , नवी मुंबई या जिल्ह्यांमध्ये हवामान ढगाळ व कोरडे असणार आहेत .तर पश्चिम महाराष्ट्रात हवामन थंड ( गारवा ) असणार आहे .
तर राज्यातील सोलापुर, सांगली , छत्रपती संभाजीनगर , परभणी , बीड व जालना या जिल्ह्यामध्ये हलक्या स्वरुपातील पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता वर्तविण्यात आले आहे .या दरम्यानच्या काळात राज्यातील सरासरी तापमान हे 38 ते 40 अंश सेल्सिअस असेल , असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे .
या पावसाचा कोकण किनार पट्टीवरील शेतकऱ्यांना हानीकारक ठरणार आहे . कारण सदर चक्रिवादळामुळे आंबा , संत्रे , द्राक्ष या फळबागांवर विपरित परिणाम होवून मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे , यामुळे शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे .
- 14 एप्रिल : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी प्राप्त केलेल्या 32 पदवी व त्यांना ज्ञात असणाऱ्या 12 भाषांची यादी जाणून घ्या सविस्तर !
- निर्धन रुग्ण व गरीब रुग्णांसाठी मोफत वैद्यकीय उपचार ; सरकारच्या धर्मदाय योजना बाबत जाणून घ्या सविस्तर !
- आधार बायोमेट्रीक फेस रिडिंग हजेरी राज्यातील कर्मचाऱ्यांचा विरोध ; जाणून घ्या सविस्तर वृत्त !
- कर्मचाऱ्यांचे वेतन / थकीत व इतर देयके अदा करणेकामी , अनुदान वितरण ; GR निर्गमित दि.09.04.2025
- दिनांक 08 एप्रिल 2025 रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले महत्वपुर्ण कॅबिनेट निर्णय !