दिनांक 06 ते 10 जून पर्यंत “या” जिल्ह्यांना पावसाचा जोरदार इशारा ;  जाणून घ्या सविस्तर अंदाज

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Heavy rain warning for these districts from June 6 to 10; Know the detailed forecast ] : दिनांक 6 ते 10 जून पर्यंत राज्यातील काही जिल्ह्यांनी पावसाचा जोरदार इशारा देण्यात आला आहे . यासंदर्भातील सविस्तर हवामान अंदाज खालील प्रमाणे पाहुयात .

हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार , आज दिनांक 6 जून पर्यंत राज्यातील हवामान कोरडे असणार आहे .  तर उद्यापासून राज्यात पुन्हा एकदा पावसाला जोरदार सुरुवात होणार आहे . उद्या दिनांक 07 जून ते 10 जून पर्यंत राज्यात जोरदार पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे .

हवामान तज्ञ पंजाबराव ढग यांनी दिलेल्या अंदाजानुसार दिनांक 07 जून ते 10 जून या कालावधीत राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची जोरदार शक्यता वर्तवण्यात आलेली आहे . यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना शेतीची मशागत करण्यासाठी केवळ आजचा दिवस शिल्लक राहणार आहे .

हे पण वाचा : प्राध्यापक , अधिव्याख्याता , लिपिक , ग्रंथालय / प्रयोगशाळा परिचर ,इ. पदांसाठी थेट पदभरती .

या 28 जिल्ह्यांना पावसाचा इशारा  ; भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील  हिंगोली, बीड , परभणी , जालना , धाराशिव ,  छत्रपती संभाजी नगर , रायगड , मुंबई , ठाणे , पुणे, धुळे , रत्नागिरी , सातारा , सांगली , नाशिक, जळगाव ,सोलापूर , अकोला , अमरावती, बुलढाणा , भंडारा , नागपूर , गडचिरोली , गोंदिया, चंद्रपूर , वर्धा , वाशिम , यवतमाळ

Leave a Comment