@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : प्रधानमंत्री सुर्यघर योजनेचा लाभ मिळवून कायमस्वरुपी विजबिलाची चिंतेमधून सुटका मिळविण्यासाठी , पीएम सुर्योदय योजनासाठी कशा पद्धतीने आवेदन करावे , पात्रता कोणती आहे . या बाबत सविस्तर माहिती या लेखांमध्ये घेवूयात ..
देशाचे पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी राममंदीराचे उद्घाटन झाल्यानंतर तब्बल 1 करोड लोकांना सुर्योदय योजना अंतर्गत मोफत सौर पॅनल देण्याची मोठी घोषणा केली आहे . या अंतर्गत देशातील नागरिकांना लाभ मिळविण्यासाठी केंद्र सरकारच्या अधिकृत्त संकेतस्थळावर आवेदन सादर करता येईल .
या योजनांच्या माध्यमातुन लाभ कोण घेवू शकतो ? : या योजनाचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा भारत देशाचा नागरिक असला पाहिजे , तसेच याचा लाभ हा ज्या ठिकाणी अद्याप विजेची सुविधा उपलब्ध झालेली नाही अशा ठिकाणच्या लाभार्थ्यांना प्राधान्याने लाभ अनुज्ञेय करण्यात येणार आहे . सदरचा लाभ हे शहरी तसेच ग्रामीण दोन्ही भागांकरीता अनुज्ञेय असणार आहेत . सदर लाभाकरीता लाभार्थी व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न हे 150,000/- रुपये अथवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक असणार आहेत .
लाभाचे स्वरुप : या योजनांच्या माध्यमातुन 1 किला वॅट क्षमत असणारे सोलर पॅनल करीता 30,000/- रुपये तर 2 किला वॅट क्षमता असणाऱ्या सोनल पॅनल करीता 60,000/- रुपये तर 3 किला वॅट क्षमता असणाऱ्या सोलर पॅनल करीता 78,000/- रुपये , तर त्यापेक्षा अधिक किला वॅट ( 10 किला वॅट पर्यंत ) करीता 78,000/- रुपये केंद्र सरकारकडून अनुदान दिले जाणार आहेत .
अर्ज प्रक्रिया : सदर योजनांच्या माध्यमातुन लाभ घेण्यासाठी https://pmsuryaghar.gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने आवदेन सादर करु शकता ..