नविन वेतन आयोगाचे पे – मॅट्रिक्स झाले निश्चित ; जाणून घ्या पगारातील वाढ !

Spread the love

@marathiprasar संगिता पवार प्रतिनिधी [ Pay matrix of the new Pay Commission has been finalized. ] : आठवा वेतन आयोगांमध्ये कर्मचारी तसेच पेन्शन धारकांच्या वेतन / पेन्शनमध्ये 20 ते 35 टक्के पर्यंत वाढ होवू शकते .

सदर पगार वाढ ही दि.01.01.2026 पासुन सुधारित वेतनसंरचना नुसार लागु करण्यात येणार आहेत . ज्यामध्ये वेतन फरक देखिल समाविष्ट आहे . यामुळे सरकारी कर्मचारी / पेन्शन धारकांना पगारांमध्ये मोठा दिलासा मिळणार आहे .

फिटमेंट फॅक्टर मध्ये नेमकी किती वाढ होणार ? : सरकारी कर्मचाऱ्यांची पगारवाढ ही फिटमेंट फॅक्टरवर आधारीत असते . सातवा वेतन आयोगानुसार 2.57 पट फिटमेंट फॅक्टरप्रमाणे पगारवाढ करण्यात आलेली होती . तर आता सुधारित वेतन आयोगांमध्ये फिटमेंट फॅक्टरचा आकडा हा 2.15 ते 2.57 पट दरम्यान असण्याची चिन्हे दिसून येत आहेत .

नेक्सडिग्मचे संचालक रामचंद्रन कृष्णमूर्ती यांच्या मते फिटमेंटचा आकडा हा 1.9 ते 2.5 पट दरम्यान असू शकतो . तर एनसी – जेसीएम चे सचिव शिव गोपाल मिश्रा यांच्या मते फिटमेंट फॅक्टरचा आकडा हा 2.57 पट अथवा त्यापेक्षा अधिक असू शकतो .

तर कर्मा ग्लोबल कन्सल्टिंग सोल्युशन्सचे एमडी श्री प्रतिक वैद्य यांच्या मते सदर फिटमेंटचा आकडा हा 1.83 ते 2.46 पट दरम्यान असू शकतो .

वरील आकडेवारीचा विचार केला असता , आठवा वेतन आयोगानुसार सरकारी कर्मचारी / पेन्शन धारकांच्या वेतन / पेन्शन मध्ये किमान 20 ते 35 टक्के पगार वाढ होवू शकेल .

Leave a Comment