जुनी पेन्शन व आश्वासित प्रगती योजनेचा GR निर्गमित करणे , सरकारला निवेदन !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ old pension scheme & ashvasait pragati yojana gr update] : राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना  (OPS) त्याचबरोबर आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळणे संदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन राज्य सरकारला  सादर करण्यात आले आहे .

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने , राज्यातील दिनांक 01 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त झालेल्या त्याचबरोबर त्यानंतर 100% वेतन अनुदान प्राप्त झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेचा ( old pension scheme ) लाभ पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात यावा . त्याचबरोबर राज्य सरकारी कर्मचारी तसेच इतर कर्मचाऱ्याप्रमाणे अनुदान प्राप्त शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देणेबाबत  निर्णय तातडीने घेवून त्या संदर्भात अधिकृत शासन निर्णय (GR) निर्गमित करण्यात यावा , असे निवेदन राज्य सरकारला सादर करण्यात आली आहे .

सदरचे निवेदन हे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य कोषाध्यक्ष तथा माजी शिक्षक आमदार नागो गाणार यांच्यावतीने , राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे याशिवाय शिक्षण सचिव श्रीम.कुंदन यांना देण्यात आलेले आहे .

दिनांक 01 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त तसेच त्यानंतर 100% अनुदान प्राप्त झालेल्या राज्यातील अनुदान प्राप्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना (old pension scheme ) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य सरकारकडून दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी तपासणी समिती गठित करण्यात आलेली होती , सदर समितीने आपला अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्त करण्यात आला आहे . सदर अहवालास सरकारकडून मंजुरी देवून अधिकृत शासन निर्णय (GR ) निर्गमित करण्यात यावा , अशी मागणी या निवेदनामध्ये करण्यात आले आहेत.

याशिवाय राज्य सरकारी कर्मचारी व अन्य पात्र कर्मचाऱ्याप्रमाणे राज्यातील अनुदान प्राप्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचे तीन लाभ लागू करणे संदर्भात अधिकृत शासन निर्णय (GR ) लवकरात लवकर निर्गमित करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे पदाधिकारी बाबासाहेब बोडखे यांनी स्पष्ट केले आहे .

Leave a Comment