आता यापुढे शासकीय दस्तऐवजावर नावानंतर आईचे नाव त्यानंतर वडिलांचे नाव आडनाव अशा स्वरुपात होणार बदल !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : आता यापुढे शासकीय दस्तऐवजावर नावानंतर आईचे नाव त्यानंतर वडिलांचे नाव व त्यानंतर आडनाव अशा स्वरुपात नोंद करण्यात येणार असल्याचा निर्णय दिनांक 13 मार्च 2024 रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे .

या निर्णयानंतर आता दिनांक 01 मे 2024 नंतर जन्मास येणाऱ्या बालकांची नोंदी ह्या प्रथम बालकाचे नाव त्यानंतर आईचे नाव व त्यानंतर वडिलांचे नाव व नंतर आडनाव अशा स्वरुपामध्ये सर्व शैक्षणिक कागदपत्रे तसेच इतर सर्व महसुली दस्तऐवज , वेतन चिठ्ठी , सेवापुस्तक अशा विविध परीक्षांचे अर्जाचे नमुद इ.सरकारी एस्तऐवजामध्ये करणे बंधनकारक असणार आहेत .

यानुसार बदल करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने जन्म व मृत्यूची नोंदवहीत आवश्यक अशा सुधारणा करुन नोंदी करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत , याबाबत राज्य सरकारने केंद्र शासनांशी विचारविनिमय करुन याबाबत अंतिम मान्यता देण्यात येणार आहेत .

तर विवाहीत असणाऱ्या स्त्रियांच्या बाबतीत सध्य स्थितीमध्ये अस्थित्वात असणाऱ्या पद्धतीप्रमाणे , विवाहाच्या नंतर तिचे नाव त्यानंतर पतीचे नाव व आडनाव अशा स्वरुपात नोंदविण्याची प्रक्रिया सुरु ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . त्याचबरोबर लग्नानंतर स्त्रीला त्याच्या विवाहापुर्वीच्या नावाने मालमत्ता दस्तऐवजांमध्ये नोंदविण्याची मुभा ठेवण्यास मुफा ठेवण्यात मान्यता देण्यात आलेली आहे .

या निर्णयानंतर मुख्यमंत्री यांचे नावाची पाटीमध्ये  एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे , तर कृषी मंत्री धनंजय रुक्मिणी पंडीतराव मुंडे अशा नावाची पाटी लावण्यात आलेली आहे . यामुळे आता सर्व सरकारी दस्तऐवजावर नावानंतर , आईचे नाव व त्यानंतर वडीलांचे नाव आडनाव असा बदल होणार आहे .

Leave a Comment