@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले असून , सदर आरक्षणास आव्हान देण्याकरिता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती , सदर याचिकेवर आज दिनांक 10 एप्रिल 2024 रोजी सुनावणी झाली .
सदर सुनावणीची माहिती देताना गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले की , प्रत्येक वेळी सुनावणी दरम्यान दोन न्यायमूर्ती याचिका ऐकत असतात . परंतु यावेळी तीन न्यायमूर्तींनी सदरची याचिका ऐकली . मराठा समाजाला आर्थिक दृष्ट्या मागासलेपणाच्या आधारावर आरक्षण देता येणार नाही , अशी भूमिका पूर्वीपासून गुणरत्न सदावर्ते यांनी नमूद केले असून , या संदर्भात उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे .
आज रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान राज्य सरकारच्या वकिलांनी वेळ वाढवून देण्याची मागणी करण्यात आली , यामुळे सदर याचिकेवर येत्या सोमवारपासून पुन्हा एकदा सुनावणीस सुरुवात होणार आहे . यावेळी मराठा आरक्षण विरुद्ध गुणरत्न सदावर्ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत .
राज्य सरकारने लागू केलेल्या मराठा आरक्षण हे कायद्याच्या चौकटीमध्ये बसणारे आरक्षण नसून , सदरचा निर्णय हा असंविधानिक असल्याचे नमूद केले आहे . येत्या सोमवारपासून होत असलेल्या सुनावणीत मराठा आरक्षण विरुद्ध गुणरत्न सदावर्ते मराठा समाजाची आर्थिक दृष्ट्या सक्षम बाजू तसेच नोकरी मधील प्रमाण , इतर समाजातील घटकावर आरक्षणाचा होणारा विपरीत परिणाम याबाबत आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत .
यापूर्वी देखील मराठा समाजास दहा टक्के आरक्षण देण्यात आले होते , जे की उच्च न्यायालयामध्ये आरक्षण टिकले नाही . तर आता दिलेले आरक्षण देखील न्यायालयापुढे टिकणार नसल्याचे , गुणरत्न सदावर्ते यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे .