@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Mansun update news ] : यंदाच्या वर्षी मान्सुन वेळेतच परतीच्या प्रवासाला लागणार असल्याचे संकेत तज्ञांकडून व्यक्त करण्यात आले आहेत . यंदाच्या वर्षी ला – निना चा प्रभाव आहे , परंतु सदर प्रभावाला आधार नसल्याने मान्सुन नियोजित वेळेतच परतीच्या प्रवासाला जाणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे .
हवामान तज्ञ तथा हवामान खात्यातुन सेवानिवृत्त झालेले हवामान अधिकारी माणिकराव खुळे यांनी दिलेल्या अंदाजानुसार राज्यात यंदाच्या वर्षी माहे ऑक्टोंबर महिन्यांच्या पहिल्या दोन आठवड्यापर्यंत मान्सुन राज्यातुन परतीच्या प्रवासाला निघून जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे .
सर्वसाधारणपणे प्रति वर्षी माहे ऑक्टोंबर महिन्यांच्या 15 तारखेपर्यंत मान्सुन देशातुन निघून जातो , तर देशांमधील ईशान्य भागांमध्ये हिवाळी हंगामाचा पर्जन्यास सुरुवात होते . यंदाच्या वर्षी हवामान खात्याने ला – निनाचा प्रभाव सांगण्यात आला आहे , ज्यांमध्ये पावस हा माहे ऑक्टोबर महिना व नोव्हेंबर महिना पर्यंत देशात पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली होती .
परंतु सदर ला – निना प्रभावाला आधार नसल्याने यंदाच्या वर्षी पर्जन्य नियोजिन काळांमध्येच परतीच्या प्रवासाला जाण्याचा अंदाज हवामान तज्ञ माणिकराव खुळे तसेच इतर तज्ञांकडून व्यक्त करण्यात आले आहेत . यामुळे यंदाच्या वर्षी ला – निनाचा प्रभाव असुनही पर्जन्यमान लांबणार नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहेत .
पुढील महिन्यांच्या दुसऱ्या आठवड्या पर्यंत राज्यात कमी – अधिक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .
राज्यात लातूर , सातारा , सांगली , कोल्हापुर , धाराशिव , अहमदनगर , सोलापुर या जिल्ह्यात हवामान कोरडे असणार आहेत असा अंदाज पंजाबरावांनी व्यक्त केला आहे . तर आज रोजी राज्यात पश्चिम महाराष्ट्र , कोकण भागात काहीसा पाऊस पडण्याची शक्यता आहे . तर दिनांक 20 सप्टेंबर पर्यंत राज्यात हवामन कोरडे राहणार असल्याचा अंदाज पंजाबराव यांनी व्यक्त केला आहे .
- राज्य कर्मचाऱ्यांना 3 वर्षातुन 10 दिवस मिळते या कामासाठी पगारी रजा ; जाणून घ्या वित्त विभागाचा शासन निर्णय !
- जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकरीता महत्वपुर्ण राजपत्र निर्गमित दि.18.07.2025
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय ; संसदेत दिली माहिती !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !