दिवाळीच्या सुट्टीत राज्यात “या” ठिकाणी करा पर्यटन ; जाणून घ्या मनोरंजक ठिकाणे ..

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ in diwali leave period travelling spot in maharashtra] : यंदाची दिवाळी सुट्टी अधिक आनंददायी करण्यासाठी , राज्यातील “या” ठिकाणी पर्यटन करणे अधिक फायदेशीर ठरेल .

01. गणपतीपुळे : गणपतीपुळे हे समुद्र किनारी वसलेले गणपतीचे भव्य मंदिर आहे . समुद्रकिनारी असल्याने , या ठिकाणचे दृश्य अधिकच मनमोहक असते , यंदाच्या काळामध्ये या ठिकाणचे सौंदर्य व दर्शन करिता हजारो भाविक भेट देत असतात , हे ठिकाण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये स्थित आहे .

02. रायगड : रायगड हा किल्ला रायगड जिल्ह्यामध्ये असून , हा किल्ला  छत्रपती शिवाजी महाराजांचे राजधानीचा किल्ला होता . सदर किल्ला हा भुईकोट किल्ला असून , डोंगरामध्ये बनवण्यात आलेला आहे . या ठिकाणी टकमक टोक,  हिरकणी बुरुज  सभा रचना  इत्यादी बाबी दृश्यनिय आहेत.

03. सप्तशृंगी गड : नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यामध्ये सप्तशृंगी मातेचे मंदिर आहे . हे मंदिर डोंगरावर असल्याने , अधिक मोहक दृश्य दिसते . या मंदिरास दररोज हजारो भाविक दर्शनाकरिता येत असतात .

04. महाबळेश्वर : सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण असून , या ठिकाणी दररोज राज्यातून त्याचबरोबर विदेशातून देखील पर्यटक येत असतात . या ठिकाणी स्ट्रॉबेरीचे उत्पादन सर्वाधिक घेतले जाते .

05. अंदमान निकोबार बेट : ज्यांचे आर्थिक बजेट चांगले आहे ,  अशांना अंदमान निकोबार बेट हे पर्यटनासाठी सर्वात चांगले ठिकाण आहे . या ठिकाणचे वातावरण त्याचबरोबर स्वातंत्र्यवीरांचे जेल पाहण्यासाठी दररोज देशातून हजारो पर्यटक भेट देत असतात .

Leave a Comment