राज्यात लोकसभेच्या निवडणुका पाच टप्यात ; कोणत्या जिल्ह्यात किती तारखेला होणार मतदान , पाहा सविस्तर !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी ; देशात पुढील महिन्यांपासून लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत , याकरीता राज्यातील लोकसंख्या व मतदारसंघाचा विचार करता , पाच टप्यांमध्ये मतदान घेण्यात येणार आहेत . कोणत्या जिल्ह्यांमध्ये मतदान कधी होणार , याबाबत सविस्तर यादी पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

पहिला टप्पा ( दि.19 एप्रिल 2024 ) : पहिल्या टप्यातील मतदान हे दिनांक 19 एप्रिल 2024 रोजी होणार आहे , यांमध्ये राज्यातील रामटेक , नागपुर , भंडारा – गोंदिया , गडचिरोली -चिमुर , चंद्रपुर या पाच मतदार संघाकरीता मतदान होणार आहेत .

दुसरा टप्पा ( दि.26 एप्रिल 2024 ) : दुसऱ्या टप्यातील मतदान हे दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी होणार आहेत .  यांमध्ये बुलडाणा , अकोला , अमरावती , वर्धा , यवतमाळ – वाशिम , हिंगोली , नांदेड , परभणी या मतदार संघाकरीता मतदान प्रक्रिया पुर्ण होणार आहे .

तिसरा टप्पा ( दि.07 मे 2024 ) : तिसऱ्या टप्यातील मतदान हे दिनांक 07 मे 2024 रोजी होणार आहे . यांमध्ये सोलापुर , धारशिव , लातुर , रायगड , बारामती , माढा , सांगली , सातारा , रत्नागिरी , सिंधुदुर्ग ,कोल्हापुर , हातकणंगले या मतदार संघाकरीता मतदान प्रक्रिया होणार आहे .

चौथा टप्पा ( दि.13 मे 2024 ) : मतदानाचा चौथा टप्पा हा दि.07 मे 2024 रोजी होणार असून , यांमध्ये बीड , शिर्डी , अहमदनगर , शिरुर , पुणे , मावळ , छ.संभाजीनगर , रावेर , जालना , जळगाव , नंदुरबार या मतदार संघाकरीता मतदान होणार आहे .

पाचवा टप्पा ( दि.20 मे 2024 ) : मतदानाचा पाचवा टप्पा हा दिनांक 20 मे 2024 रोजी होणार असून , यांमध्ये धुळे , दिंडोरी , नाशिक , पालघर , भिवंडी , कल्याण , ठाणे मुंबई मधील एकुण 06 मतदार संघ करीता मतदान होणार आहेत .

Leave a Comment