मुलीच्या लग्नाची चिंता सोडा ; LIC च्या योजनेत करा गुंतवणुक मुलीच्या लग्नाला मिळतील तब्बल 27 लाख रुपये !

Spread the love

@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी : आपल्याला मुलगी असेल तर , त्याच्या लग्नाची चिंता येत असल्यास , एलआयसीच्या खास कन्यादानासाठीच्या योजनेत गुंतवणुक करत गेल्यास , आपणास त्याच्या लग्नावेळी तब्बल 27 लाख रुपये पर्यंतचा आर्थिक लाभ मिळेल , ज्यामुळे मुलीच्या लग्नाची चिंता मिटणार आहे .

या योजनेचे नाव म्हणजे LIC कन्यादान योजना असे आहे , या योजनांमध्ये गुंतवणुक केल्यास आयकर नियम 1961 नुसार सुट मिळते , जी कि प्रतिवर्ष  कमाल 1.5 लाख रुपये इतकी असते . या योजनाच्या माध्यमातुन आपण जर दररोज 121/- रुपये इतकी रक्कम गुंतवत गेल्यास , आपल्याला प्रतिमहा 3600/- रुपये इतका प्रमियम पडेल . ज्याची मुदत ही 25 वर्षे इतकी असणार आहे . 25 वर्षाच्या नंतर या योजनेतून तब्ल 27 लाख रुपये इतकी रक्कम मिळेल .

मुलींच्या वयानुसार विम्याची कमाल मुदत ही 13 वर्षे ते 25 वर्षे इतकी असेल ,ज्यांमध्ये आपल्या सोयीनुसार मुदत विमा घेवू शकता .तसेच यांमध्ये किमान 75/- दररोज तर कमाल 121/- रुपये इतकी रक्कम गुंतवू शकता . जर आपण या योजना अंतर्गत किमान रक्कम 75/- रुपये दररोज गुंतविल्यास , आपणास प्रतिमहा 2250/- रुपये इतका मासिक प्रमियम भरावा लागेल , तर मुदतीनंतर आपणांस 14 लाख रुपये इतकी रक्कम प्राप्त होईल .

या योजनांच्या माध्यमातुन आपणांस टॅक्स मध्ये मोठी सुट मिळत असते , यांमध्ये आपणांस रुपये 1.5 लाख रुपये इतकी रक्कम सुट दिली जाते . तर यांमध्ये विमाधारक ( मुलीचे वतीने विमा उतरविणारे पालक ) याचा मृत्यु विमा अवधी संपण्याच्या अगोदरच झाल्यास , विमाधारकाच्या परिवारास 10 लाख रुपये पर्यंत रक्कम देण्याची तरतुद आहे .

यामुळे मुलींच्या नावे एलआयसीची कन्यादान योजना अंतर्गत विमा काढणे अधिक सोयीस्कर ठरणार आहे . ह्या योजना अंतर्गत विमा काढण्यासाठी आपणास आधार कार्ड अथवा इतर कोणताही ओळखीचा पुरावा , उत्पन्नाचा दाखला , पासपोर्ट साईज फोटो , जन्म दाखला इ. कागदपत्रांची आवश्यक असेल .

Leave a Comment