@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ ladaki bahin yojana new nikash] : लाडकी बहीण योजनेचे नवीन निकष जारी करण्यात आले आहेत , सदर निकषांमध्ये असणाऱ्या महिलांनाच यापुढे सदर योजने अंतर्गत पैसे प्राप्त होणार आहेत . या संदर्भातील सविस्तर निकष कोणते आहेत ? ते पुढील प्रमाणे पाहूयात ..
वार्षिक उत्पन्नाची अट : सदर योजने अंतर्गत लाभ घेण्याकरिता यापुढे महिलांना आता वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपये पेक्षा कमी असल्याचे , कागदपत्र सादर करावी लागणार आहेत . यासाठी उत्पन्नाचा दाखला काढावा लागणार आहे . त्यामध्ये जर वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपये पेक्षा अधिक राहिल्यास , अशा महिलांना सदर योजने अंतर्गत लाभ मिळणार नाहीत .
जमीन मालकी निकष : ज्या महिलांच्या नावे 05 एकर पेक्षा अधिक जमिनी आहेत , अशा महिला यापुढे सदर योजने अंतर्गत लाभ घेण्यास अपात्र ठरणार आहेत .
निवृत्तीवेतन / वाहनधारक महिला निकष : निवृत्तीवेतन घेत असणाऱ्या महिला यामध्ये श्रावणबाळ योजना अंतर्गत अथवा इतर कोणत्याही सरकारी योजनेतून पेन्शन घेत असल्यास , अशा महिला यापुढे सदर योजने अंतर्गत लाभ घेण्यास अपात्र ठरणार आहेत .याशिवाय चार चाकी वाहनधारक महिलांना यापुढे सदर योजने अंतर्गत लाभ प्राप्त होणार नाहीत . याकरिता सरकारकडून विशेष अतिरिक्त छाननी मोहीम हाती घेण्यात येणार आहे .
कुटुंबातील मर्यादित महिलांनाच लाभ : सदर योजना अंतर्गत एका कुटुंबातील फक्त दोन महिलांनाच सदर योजने अंतर्गत लाभ मिळणार आहे . त्यापेक्षा अधिक महिला असल्यास , अशा महिलांना सदर योजना अंतर्गत लाभ प्राप्त होणार नाहीत .
- 24 वर्षे सेवा पुर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना निवडश्रेणी लाभ देणेबाबत प्रस्ताव सादर करणेबाबत परिपत्रक !
- 7 वा वेतन आयोगाचे उर्वरित हप्ते देयके तसेच वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके सादर करणेबाबत , अत्यंत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित !
- आज पासून मोबाईल वापरण्याच्या नियमांमध्ये मोठे महत्त्वपूर्ण बदल ; जाणून घ्या सविस्तर !
- लाडकी बहीण योजनेचे नवीन निकष ; आता फक्त याच महिलांना मिळणार पैसे !
- सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वर्षात महागाई भत्ता वाढीबरोबर या 02 भत्त्यामध्ये मिळणार वाढ ; जाणून घ्या सविस्तर !