नवीन शैक्षणिक वर्षात शाळा 01एप्रिल पासून भरणार ; सुकाणु समितीची शिफारस !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ In the new academic year, the school will start from April 01 ] : नवीन शैक्षणिक वर्षापासून शाळेची घंटा ही दिनांक 01 एप्रिल पासूनच वाजणार , अशा प्रकारची शिफारस सुकाणु समितीने राज्य सरकारकडे केली आहे . ज्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याची सुट्टी पासून वंचित रहावे लागणार आहेत .

सुकाणू समिती ही नवीन शैक्षणिक धोरण राबवण्या संदर्भात गठित करण्यात आली होती . सदर समितीने आपला अहवाल राज्य सरकारकडे सादर केला असून , राज्य सरकारचा अभ्यासक्रम हा सीबीएसई (CBSE) पॅटर्न वर आधारित करण्याची शिफारस केली आहे .

यामध्ये विशेष बाब म्हणजे नवीन शैक्षणिक धोरण हे जून महिन्यापासून सुरू न करता 01 एप्रिल पासूनच भरवण्याची धोरण ठेवण्यात आली आहे . ज्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याची सुट्टी मिळणार नाही .

सदर अहवाल राज्य सरकारकडे प्राप्त झाला असून , यावर राज्य सरकारकडून आपली भूमिका स्पष्ट केली जाईल . त्यानंतरच सुकाणू समितीने सादर केलेले धोरण अंमलात आणतील . यामध्ये शाळेच्या शैक्षणिक सत्र हे 01 एप्रिल पासून सुरू करण्यावर पालकांची त्याचबरोबर राज्यातील विविध शैक्षणिक संस्थांची राज्य सरकारकडून चर्चा केली जाईल .

सदरची नवीन धोरण बदलण्यासाठी राज्य सरकारकडून नवीन शैक्षणिक धोरण आखण्यात येतील , त्यानंतरच सदर सुकाणू समितीच्या शिफारसीचे धोरण लागू करतील .

Leave a Comment