Live Marathipepar [ honour Order of The Druk Gyalpo Award ] : भूतान देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार आपल्या देशाचे विद्यमान पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांना मिळाला आहे . आतापर्यंत नरेंद्र मोदी यांना 15 देशांनी आपल्या देशातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले आहेत .
भुतान देशाचा सर्वोच्च नागरीक सन्मान असणारा ऑर्डर ऑफ द डुक ग्यालपो (Order of the Druk Gyalpo ) हा पुरस्कार असून , नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले परदेशी नागरीक आहेत . हा पुरस्कार केवळ भुतानच्या नागरिकांनाच दिला जातो , परंतु नरेंद्र मोदी यांनी भुतानला दिलेले योगदान , त्यांची प्रतिष्ठा या बाबींचा विचार करुन या सर्वोच्च नागरीक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .
शिवाय हा सर्वोच्च नागरिक पुरस्कार यापुर्वी केवळ चार जनांनाच मिळाला आहे , यापुर्वी सन 2008 या साली भूतानची राणी दादी आशी केसांग चोडेन वांगचुक यांना दिण्योत आला आहे , त्यानंतर सन 2008 मध्ये जे थ्रिजुर तेनजिन डेंडूर – भुतानचे 68 वे जे खंपो यांना सन्मानित करण्यात आले , त्यानंतर सन 2018 मध्ये जे खेंपो टुलकु न्गावांग जिन्मे यांना देण्यात आलेला आहे .
भुतान व भारत देशाचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगतुक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ऑर्डर ऑफ द डुक ग्यालपो या सर्वोच्च नागरिक पुरस्काराने सन्मानित केले .
भुतान या देशाची संरक्षण करण्याची तसेच परकीय आक्रमणापासून संरक्षण करण्याची जबाबदारी ही भारत देशाची आहे , तसा भुतानने चीन देशाच्या आक्रमणांपासून संरक्षण मिळविण्याकरीता भारतासोबत करार केला आहे .