@marathiprasar चंदना पवार प्रतिनिधी [ Holidays on 13th and 14th December 2025 cancelled due to winter sessions ] : हिवाळी अधिवेशनांमुळे दिनांक 13 व 14 डिसेंबर 2025 रोजीची सुट्टी रद्द करण्यात आली असून , सदर दिवशी पुर्ण क्षमतेने कार्यालये सुरु ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . याबाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दि.12.12.2025 रोजी परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहेत .
सदरचे परिपत्रक हे शालेय शिक्षण व क्रिडा विभाग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सर्व कार्यालयांना निर्देश देण्यात आले आहेत .यानुसार शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशी देखिल कार्यालये सुरु ठेवावे लागणार आहेत .
सध्या राज्याचे विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे . यानुसार महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय मुंबई यांच्या परिपत्रक व आयुक्त ( शिक्षण ) कार्यालयाचे पत्र दि.10.11.2025 या संदर्भिय पत्रानुसार निर्देश देण्यात आले आहेत .
यांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , राज्याचे सन 2025 चे हिवाळी अधिवेशन विधान भवन नागपुर येथे दिनांक 08.12.2025 पासुन सुरु झाले आहे . यामुळे दिनांक 13.12.2025 वार शनिवारी ….
व दि.14.12.2025 वार रविवार रोजी सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी अधिवेशन कामकाज सुरु राहणार आहे . त्या अनुषंगाने दिनांक 13.12.2025 व दि.14.12.2025 रोजी कार्यालये पुर्ण क्षमतेने सुरु ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

- NPS : राष्ट्रीय पेन्शन योजनाची नविन नियमावली जारी ; जाणुन घ्या सुधारित नियम !
- राज्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा ; उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या मागणीला दिली मंजूरी !
- केंद्राप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांनाही दि.01.07.2025 पासुन 3% महागाई भत्ता वाढ मिळणेबाबत ….
- शिक्षकांसाठी धक्कादायक बातमी ; टीईटी परीक्षा दि.31.08.2026 पर्यंत उत्तीर्ण व्हावीच लागणार – विधी व न्याय विभागाचा अभिप्राय !
- सन 2026 या वर्षातील शाळांना सुट्टीची यादी ( दिवाळी , उन्हाळी , इतर सार्वजनिक ) ; पाहा सविस्तर !