सर्वाधिक भाव असणाऱ्या या पिकांची शेतीमध्ये करा लागवड ; होईल मोठा आर्थिक फायदा !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : आपण पारंपारिक पद्धतीने काही विशिष्ट्य पिकांचीच लागवड करीत असतो , परंतु आपण जर जास्त भाव असणाऱ्या पिकांची लागवड केल्यास , निश्चित आपणांस मिळणारे आर्थिक फायद्यांमध्ये मोठी वाढ होईल . असे कोण-कोणते पिके आहेत . त्या बाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे घेवूयात ..

01.लसुण : लसूण या पिकाची लागवड राज्यातील कोणत्याही क्षेत्रात केली जावू शकते , राज्यातील सर्व जिल्ह्यांतील जमिनींमध्ये लसूण हे पिक चांगल्या पद्धतीने येतात . यामुळे लसूण पिकांची लागवड केल्यास , आपणांस निश्चित मोठा आर्थिक फायदा होणार आहे . राज्यातील बाजार पेठामध्ये लसूण देसी चे सर्वसाधारण दर हे 13,000/- रुपये प्रति क्विंटल आहे , तर लसूण मध्यम चे राज्यातील सर्वसाधरण दर हे 15,000/- प्रति क्विंटल ऐवढे आहेत . तर लसूण मध्यम चे कमाल दर हे 25,000/- रुपये ऐवढे आहेत .

02.मसुर : मसुर चे उत्पादन राज्यांमध्ये कमी प्रमाणात होते , यांचे सर्वसाधारण दर पाहिले असता , मसुरचे किमान प्रति क्विंटल भाव 7000/- रुपये तर कमाल प्रति क्विंटल भाव हे 7,750/- रुपये ऐवढे आहेत . याचे उत्पादन कमी होते , यामुळे किंमत देखिल वाढते .

03.अंजीर : आपण जर फळ शेती करत असाल तर अंजीर ची शेती करणे अधिक लाभ दायक ठरेल , अंजीर मध्यम चे सर्वसाधारण दर हे 5,500/-रुपये प्रति क्विंटल ऐवढे आहेत . राज्यांमध्ये औरंगाबाद मध्येचे अंजीराची शेती केली जाते . इतर फळांपेक्षा अंजीरचे भाव अधिक असल्याने , अंजीर फळांची शेती करणे अधिक फायदेशिर ठरेल .

04.ओवा : ओवाचे पिक हे कोरड्या हवामानांमध्ये अधिक घेतले जाते , तसेच हलकी -मध्यम स्वरुपाची जमीन तसेच या पिकास कमी पाण्याची आवश्यकता असल्याने राजस्थान तसेच गुजरात राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पिक घेतले जाते . राज्यांमध्ये विदर्भ , पश्चिम महाराष्ट्रात या पिकांची लागवड करण्यात येते , ओवा चे सर्वसाधारण भाव हे 14,200/- रुपये प्रति क्विंटल ऐवढे आहेत . त्यामुळे हवामानानुसार शेतकऱ्यांनी ओवाची शेती करणे अधिक फायदेशिर ठरेल .

Leave a Comment