@marathiprasar चंदना पवार प्रतिनिधी [ Happy update for December salary; GR issued on 22.12.2025 ] : माहे डिसेंबर वेतन करीता आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे . ती म्हणजे कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर 2025 वेतन करीता अनुदान निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे ..
शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दिनांक 22.12.2025 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या निर्णयानुसार लेखाशिर्ष निहाय व नियंत्रक अधिकारी यांच्या अधिनस्त अनुदानाचे वितरीत करण्यात येत आहे .
यांमध्ये सर्वसाधारण शिक्षण , प्राथमिक शिक्षण , संचालन व प्रशासन , नगरपालिका शाळा मंडळाचे / जिल्हा परिषदांचे प्रशासकीय अधिकारी , प्राथमिक शाळांची तपासणी , शिक्षकांचे प्रशिक्षण , शिक्षणशास्त्र महाविद्यालये , माध्यमिक शाळांची तपासणी , सर्वसाधारण संचालन व प्रशासन …
आयुक्त ( शिक्षण ) सर्वसाधारण संचालन व प्रशासन शाळा न्यायाधिकरणे , ई-गव्हर्नन्स कार्यक्रम ,विद्यार्थ्यांच्या युवक कल्याण कार्यक्रम , बालवीर व वीरबाला महाराष्ट्र छात्रसेना , महाराष्ट्र छात्र सेना , क्रिडा व खेळ क्रिडा प्रशिक्षण केंद्राची स्थापना , क्रिडांगणांचा विकास , सामाजिक सुरक्षा व कल्याण , सचिवालय शालेय शिक्षण व क्रिडा विभाग इ. लेखाशिर्षनिहाय निधीचे वितरण करण्यात येत आहेत .
यामुळे शालेय शिक्षण विभाग अधिनस्त कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर 2025 पेड इन जानेवारी वेतन विधीत कालावधीत अदा होणार आहे . सदर निधीचे वितरण करताना कर्मचाऱ्यांना वित्त विभाग मार्फत वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय , परिपत्रक ,सुचनांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
- महसुल विभाग मार्फत 11 मोठे महत्वपुर्ण निर्णय निर्गमित ; जाणून घ्या सविस्तर निर्णय !
- माहे डिसेंबर वेतन करीता आनंदाची अपडेट ; GR निर्गमित दि.22.12.2025
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.22.12.2025 रोजी निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- NPS : राष्ट्रीय पेन्शन योजनाची नविन नियमावली जारी ; जाणुन घ्या सुधारित नियम !
- राज्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा ; उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या मागणीला दिली मंजूरी !