राज्यातील इ.1 ली ते 8 वी पर्यंतच्या सर्व शाळांमध्ये शनिवारी शाळा न भरवता “आनंददायी शनिवार” उपक्रम राबविण्यात येणार ; GR निर्गमित दि.14.03.2024

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : राज्यातील राज्य मंडळ अंतर्गत कार्यरत सर्व शाळांमध्ये शनिवारच्या दिवशी शाळा न भरवता दर शनिवारी आनंददायी शनिवार उपक्रम राबविण्यास राज्‍य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागाच्या दिनांक 14 मार्च 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे .

लहान मुलांच्या साहस , वैज्ञानिक चिंतन , नैतिक मूल्य , असणाऱ्या उत्तम मनुष्यत्वाचा विकास , करुणा , सहानुभुती अशा नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा महत्वाचा उद्देश समोर घेवून , राज्य शासनांकडून इयत्ता 1 ली ते इयत्ता 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा शिक्षणाची अभिरुची वाढीस लागावी , याकरीता दर शनिवारी आनंदायी शनिवार हा उपक्रम राबविण्यास सदर शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहेत .

सदरचा उपक्रम हा आठवड्यातील दर शनिवार राबविण्यात येणार असून सदर उपक्रमाचे प्रमुख उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांच्या मानसिक स्थास्थ उत्तम राखणे , विद्यार्थ्यांचे सामाजिक , भावनिक कौशल्ये विकसित करणे , शालेय स्तरावर ताणतणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनविणे , विर्द्यांमध्ये संभाषण कौशल्य विकसित करणे , तसेच विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व नैराश्येवर मात करण्याची क्षमता निर्माण करणे तसेच विद्यार्थ्यांना शिकण्याची तयारी खेळीमेळीच्या वातावरणातुन करणे ..

सदर आनंदायी शनिवार मध्ये पुढील उपक्रम / कृतींचा समावेश असणार आहे ;

  • आपत्ती व्यवस्थापनातची मुलतत्वे व व्यावहारिक प्रशिक्षणे
  • प्राणायाम / श्वसनाची तंत्रे ,ध्यान -धारणा / योग
  • दैनिक जिवनातील वित्तीय व्यवस्थापन
  • कृती , खेळ यावर आधारित उपक्रमे
  • नातेसंबंध हाताळण्याचे कौशल्ये
  • Mindfulness वर आधिरित कृती व उपक्रमे
  • समस्या निराकरणाची तंत्रे
  • रस्ते सुरक्षा
  • स्वत : च्या आरोग्याची रक्षण करण्याकरीता उपाय योजना

आनंदायी शनिवार बाबत राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 14 मार्च 2024 रोजी निर्गमित GR पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

Leave a Comment