राज्यात निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत कृती कार्यक्रम राबविणेबाबत शासन निर्णय निर्गमित दि.05.03.2025

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Government decision issued regarding implementation of action programs under Nipun Maharashtra Mission in the state ] : राज्यात निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत कृती कार्यक्रम राबविणेबाबत , शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दिनांक 05 मार्च 2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे .

सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , राज्यातील इयत्ता 2 री ते 5 वी च्या वर्गातील शालेय विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता वृद्धींगत करण्याकरीता निपुण महाराष्ट्र अभियान व त्या अंतर्गत प्रस्तुत कृती कार्यक्रम राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे .

कृती कार्यक्रमाचे ध्येय म्हणजे वर्गातील 100 टक्के विद्यार्थ्यांनी 100 टक्के अध्ययन क्षमता प्राप्त करणे अपेक्षित आहे , परंतु नियंत्रणाबाहेरील कारणांचा विचार करुन इयत्ता 02 री ते 05 वीच्या प्रत्येक वर्गातील किमान 75 टक्के विद्यार्थ्यांनी या कृती कार्यक्रम अंतर्गत सर्व अध्ययन क्षमता प्राप्त करणे असे ध्येय या अभियान अंतर्गत प्रस्तुत कृती कार्यक्रम साठी निश्चित करण्यात येत आहे .

कार्यक्रमाची व्याप्ती : सदर कार्यक्रमाची व्याप्ती ही कृती कार्यक्रम स्वयंअर्थ सहायित व विना अनुदानित शाळा व तुकड्यांव्यतिरिक्त राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या इयत्ता 02 री ते 05 वीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी लागु राहणार आहेत . यांमध्ये इयत्ता 06 वी ते 08 वीच्या शिक्षकांना ऐच्छिक स्वरुपात सहभागी होता येणार आहे .

तसेच सदर कार्यक्रमाचा कालावधी हा दिनांक 05 मार्च 2025 ते दिनांक 30.06.2025 असा राहणार आहे . तसेच यांमध्ये चावडी वाचन व गणन बाब नमुद करण्यात आलेली आहे . या बाबतचा सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click Here

Leave a Comment