@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ gharelu kamagar bhandi vatap shasan nirnay ] : घरेलू कामगार कल्याण महामंडळ मार्फत नोंदणीकृत घरेलू कामगारांना त्यांच्या संसार उपयोगी भांडी भेटवस्तू म्हणून वाटप करण्यास राज्य शासनाच्या उद्योग ऊर्जा व कामगार विभागाकडून दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी महत्त्वपूर्ण शुद्धिपत्रक निर्गमित झालेला आहे .
सदर विभागाच्या दिनांक 22 फेब्रुवारी 2024 रोजीच्या शासन आदेशानुसार सन 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये राज्यातील घरेलू कामगार कल्याण मंडळ अधिनियम 2008 या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी , त्याचबरोबर राज्यातील घरेलू कामगार कल्याण मंडळ मार्फत घरेलू कामगारांची नोंदणी त्याचबरोबर नोंदणीकरण वाढवणे , या अनुषंगाने सदर योजना राबविण्याकरिता जीवित सक्रिय नोंदीत असणाऱ्या घरेलू कामगारांना राज्य शासनाच्या घरी कामगार कल्याण मंडळ अधिनियम 2008 च्या कलम 22 नुसार संसार उपयोगी भांडी त्याचबरोबर संच वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 7 मधील नियम 17 या ऐवजी महाराष्ट्र राज्याच्या घरेलू कामगार मंडळ अधिनियम 2008 च्या कलम 15 पोट कलम दोन (ग) नुसार प्राप्त अधिकाराच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यातील घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या निधीमधून जीवीत त्याचबरोबर सक्रिय नोंदीत घरेलू कामगारांना संसार उपयोगी भांडी भेटवस्तू
घरेलू कामगारांना संसार उपयोगी भांडी भेटवस्तू वाटप करिता खर्च करण्यास सदर शासन शुद्धिपत्रकानुसार अनुमती देण्यात आलेली आहे. यामुळे सदर योजना अंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आलेली आहे , याकरिता घरेलू कामगार यांची नोंदणी असणे आवश्यक असेल नसल्यास त्वरित करून घ्यावी व ऑनलाईन तसेच ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा .
- SGB : सॉव्हरिन गोल्ड बाँड मधील गुंतवणुकीचा दुहेरी आर्थिक फायदा !
- अजित पवार गट व शिंदे गटातील “या” नेत्यांना पहिल्या यादीत कॅबिनेट मंत्र्याची वर्णी लागणार ; जाणून घ्या संभाव्य यादी..
- कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळांपासुन संरक्षण करण्यासाठी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित दि.02.012.2024
- फेंगल चक्रीवादळामुळे राज्यातील “या” जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता ; जाणून घ्या पंजाबराव यांचा पावसाचा अंदाज !
- तुलशी तंती शिष्यवृती कार्यक्रम 2024-25 मुलींसाठी प्रतिवर्षी 120,000/- रुपये पर्यंत शिष्यवृत्ती ; असा करा अर्ज !