भारतीय संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाल्याने , “घर घर संविधान” कार्यक्रम साजरा करणे , बाबत GR निर्गमित !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ ghar ghar sanvidhan shasan Nirnay ] : यावर्षी भारतीय संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त , संविधान अमृत महोत्सव सन 2024-25 पासून घर घर संविधान कार्यक्रम साजरा करणेबाबत , राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मार्फत दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी महत्त्वपूर्ण GR निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर शासन निर्णयानुसार राज्यातील शाळा , महाविद्यालये ,शैक्षणिक संकुले , शासकीय वसतिगृहे त्याचबरोबर शासकीय निवासी शाळा , शासन मान्यता प्राप्त / विनाअनुदानित अनुदानित स्वयंअर्थसाह्य शाळा / आश्रम शाळा व वसतीगृहे त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्था , महाराष्ट्र विधानपरिषद / विधानसभा अशा सर्व ठिकाणी भारतीय राज्यघटनेबाबत ..

जागरूकता त्याचबरोबर घटनात्मक अधिकार व कर्तव्य याबद्दल सर्व नागरिकांमध्ये जागरूकता वाढवण्याकरिता संविधान अमृत महोत्सव सन 2024-25 “घर घर संविधान” साजरा करण्या करिता संविधानाची जागरूकता , शिक्षण मूल्य , संस्कार सक्रिय सहभाग राष्ट्रीय एकात्मता या उद्देशाने साजरा करण्याचे निर्देश देण्यात आलेली आहेत .

यानुसार राज्यातील वरील नमूद सर्व ठिकाणी भारतीय राज्यघटने बाबत जागरूकता तसेच उपेक्षित समुदायांमध्ये घटनात्मक अधिकार तसेच कर्तव्य याबद्दल जागरूकता वाढवण्याकरिता संविधान अमृत महोत्सव मध्ये विविध स्पर्धा / उपक्रम आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

या कार्यक्रमांमध्ये उद्देशिका लावणे , संविधान प्रास्ताविका उद्देशिकेचे वाचन तसेच भारतीय संविधान याबाबत सर्वसाधारण माहिती देणे तसेच संविधान मूल्य यावर पथनाट्य तयार करणे , पोस्टर , फलक प्रदर्शने आयोजित करणे, पथनाट्य पोस्टर प्रदर्शन , लेखन , भाषण ,वादविवाद अशा प्रकारचे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आलेली आहेत .

तर ग्रामीण व नागरी स्वराज्य संस्थांमध्ये सर्वसाधारण सभा , मासिक सभा , ग्रामसभा इत्यादी सभांची सुरुवात भारतीय संविधान प्रास्तविकेच्या वाचनाने करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . तर राज्याचे विधानपरिषद / विधानसभा क्षेत्रांची सुरुवात भारतीय संविधान प्रस्थाविकेच्या वाचनाने करण्याचे निर्देश देण्यात आलेली आहेत . त्याचबरोबर राज्यातील 36 जिल्ह्यामध्ये संविधान प्रबोधन होण्याकरिता संविधान संमेलनाचे आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

याबाबतचा सविस्तर GR डाऊनलोड करण्याकरीता Click Here

Leave a Comment