राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा ;  ई – पीक पाहणीवर नोंद करण्यासाठी मुदतवाढ !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ e-pik पाहणी mudatvadh nirnay ] : राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारा राज्यातील खरीप हंगाम 2024 मधील शेतकरी स्तरावरील ई – पीक पाहणी करिता मुदतवाढ देणे संदर्भात महत्वपूर्ण परिपत्रक राज्य शासनाच्या महसूल विभागाकडून निर्गमित झाला आहे .

सदर परिपत्रक राज्यातील सर्व विभागीय आयुक्त यांच्या प्रति जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख पुणे यांच्यामार्फत सादर करण्यात आलेला आहे .  सदर परिपत्रक राज्यस्तरीय नियंत्रण समिती यांच्या दिनांक 11 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने निर्णय घेण्यात आलेला आहे .

सदरच्या पत्रकामध्ये नमूद  आहे की , सन 2024-25 या खरीप हंगाम मधील ई- पीक पाहणी ( E- pik pahani ) या ॲप्समध्ये  ऑनलाइन मोबाईलच्या माध्यमातून नोंदणी करण्यासाठी दि .15.09.2024 पर्यंत मुदत देण्यात आली होती . परंतु राज्यांमध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी तसेच मुसळधार पाऊस यामुळे शेतकरी स्तरावरील ई – पिक पाहणीचे कामकाज पूर्ण झालेले नाहीत , असे निदर्शनास आले असून , सद्यस्थितीमध्ये सदर ईपीक पाहणी अंतर्गत शेतकऱ्यामार्फत पिकांची नोंद खूप कमी प्रमाणात झाल्याची दिसून आली आहे .

यामुळे राज्य शासनाकडून खरीप हंगाम 2024 साठी 07 दिवसांची म्हणजेच दिनांक 23 सप्टेंबर 2024 पर्यंत शेतकरी स्तरावरील ई – पीक पाहणी नोंद करिता मुदतवाढ देण्यात येत आहे . त्याचबरोबर तलाठी / सहाय्यक स्तरावरील ई – पीक पाहणी मुदत दिनांक 23 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे .

सदर निर्णयामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना ई- पीक पाहणीची खरीप हंगाम 2024 करिता दिनांक 23 सप्टेंबर 2024 पर्यंत नोंद करता येणार आहेत . सदरची नोंद करणे अत्यावश्यक आहे , याशिवाय राज्य शासनाकडून मिळणारे नुकसान भरपाई , मदत निधी दिली जात नाही , त्यामुळे शेतकऱ्यांनी सदर नोंद करणे आवश्यक असणार आहे .

Leave a Comment