@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Chief Minister Fadnavis gave some important instructions in the situation of war between India and Pakistan. ] : सध्या भारत – पाकिस्तान युद्धाची स्थिती अधिकच वाढले असून , भारताकडून प्रथम हल्ले केले जात नसून , पाकिस्तानच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हल्ले केले जात आहे .
अशा युद्धजन्य परिस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत . ज्यामुळे नागरिक सतर्क राहतील व आपले संरक्षण करण्याकरिता प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करतील .
सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये राज्यात देखील आपत्ती जनक स्थिती निर्माण होऊ शकते . त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये मॉकड्रिल त्याचबरोबर वॉर रूम स्थापन करण्याची निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून देण्यात आली आहे .
ब्लॅकआउट करताना हॉस्पिटल बाहेरून गडद कापडाने झाकून प्रकाश बाहेर येणार नाही , अशा पद्धतीने तयारी करण्याची निर्देश देण्यात आली आहे . ज्यामुळे हॉस्पिटल मध्ये आवश्यक प्रकाश सुरू राहील . त्याचबरोबर ब्लॅक आउट म्हणजे काय या संदर्भात नागरिकांमध्ये माहिती देऊन जनजागृती करण्याचे निर्देश दिले गेले आहेत .
हे पण वाचा : शिक्षक , कार्यालय लिपिक / लेखापाल , शिपाई इ. पदासाठी थेट पदभरती ..
युनियन वॉर बुक चे सखोल अभ्यास करून , प्रशासनातील सर्व अधिकारी यांना त्या संदर्भात माहिती देण्याची निर्देश देण्यात आले आहेत . त्याचबरोबर सध्याची युद्धजन्य परिस्थितीमुळे राज्यातील सर्व अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आले आहेत .
सैनिकी हालचालींचे चित्रीकरण करून ते सोशल मीडिया वर अपलोड करणे गुन्हा असून , अशा पद्धतीची कृती करू नयेत असे आव्हान करण्यात आले आहे . सायबर अटॅक होऊ नये याकरिता सायबर ऑडिट करण्याचे निर्देश दिले गेले आहेत .
शहरामध्ये पोलीस यंत्रणा कडून गस्त घालण्याचे प्रमाण वाढविण्याचे व सागरी सुरक्षेसाठी उपाय योजना करण्याची निर्देश दिले गेले आहेत .
- राज्य कर्मचाऱ्यांना 3 वर्षातुन 10 दिवस मिळते या कामासाठी पगारी रजा ; जाणून घ्या वित्त विभागाचा शासन निर्णय !
- जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकरीता महत्वपुर्ण राजपत्र निर्गमित दि.18.07.2025
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय ; संसदेत दिली माहिती !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !