आज दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आले 13 महत्वपूर्ण निर्णय !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ cabinet nirnay dated 05 September 2024 ] : आज दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती , सदर बैठकीमध्ये विविध 13  महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आली आहे .

महामार्ग सुधारणा : सदर कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुंबई – शिरूर-  अहमदनगर – छत्रपती संभाजी नगर राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा करण्याचे सदर बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे  . यामध्ये पुणे ते शिरूर 53 किलोमीटर लांबीचा मार्ग सहा पदरी करण्यात येणार असून , सदर कामकाजाकरिता 7,515 कोटी इतका खर्च अपेक्षित असून शिरूर अहमदनगर मार्गे छत्रपती संभाजी नगर रस्ता करिता 2,050 कोटी रुपये खर्च करणे अपेक्षित असुन  सदर खर्चाला मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे .

अंगणवाडी केंद्राकरिता सोलर सुविधा : शासकिय मालकीच्या एकूण 36, 978 अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा देण्याचा मोठा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे , यामुळे राज्यातील सदर अंगणवाड्या सौर सिस्टिमच्या छताखाली येणार आहेत .

न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित भत्ते : राज्यातील औद्योगिक कामगार न्यायालयातील अधिकाऱ्यांना सुधारित भत्ते देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून , सदर निर्णय 1 जानेवारी 2016 पासून थकबाकीस देयके सादर करण्यास मान्यता देण्यात आली आहे .

लाडकी बहीण योजनेमुळे इतर योजना बंद होणार नाहीत : लाडकी बहिण या योजनेमुळे शेतकरी कुटुंबीयातील इतर मदत योजना मिळणार नाहीत अशा प्रकारच्या चुकीचे वृत्त पसरत असून लाडकी बहीण योजनेमुळे इतर योजना बंद होणार नाहीत , असे स्पष्टीकरण सदर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नमूद करण्यात आले आहेत .

तसेच थकबाकी देणाऱ्या कुक्कुटपालन संस्थांना दंडव्याज माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सदर बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे . तसेच बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या निकष सुधारित करण्यात आले असून , शेततळे ,  विहीर करिता विज जोडणीसाठी भरीव अनुदानाचे तरतूद करण्यात आली आहे .

नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यामधील सहकारी अर्थसाह्य करण्यास सदर निर्णयान्वये मंजुरी देण्यात आलेली आहे , अमरावती जिल्ह्यामध्ये नवीन मत्स्य विज्ञान महाविद्यालय उभारणी करण्याकरिता जागा उपलब्ध करून देण्यास मंजुरी देण्यात आली आहे .

Leave a Comment