@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Big lottery for government employees; Increase in this 02 Allowance due to increase in DA ] : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची मोठी महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी समोर येत आहे , ती म्हणजे महागाई भत्ता वाढीनंतर केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या खाली नमूद 02 भत्त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .
प्राप्त माहितीनुसार केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) माहे जुलै 2024 पासून 50 टक्के वरून 53% इतका झाला आहे . यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या इतर देय भत्त्यामध्ये वाढ करण्याची तरतूद सातवा वेतन आयोगानुसार (7th pay commission) करण्यात आलेली आहे .
नर्सिंग भत्ता : सरकारी कर्मचाऱ्यांना दिला जाणारा नर्सिंग भत्त्यामध्ये महागाई भत्ता 50% पेक्षा अधिक झाल्यास वाढ होणे नियोजित असल्याने , सदर भत्त्यातील वाढ ही माहे जुलै 2024 पासून पूर्वलक्षी प्रभावाने वाढविण्यात येणार आहे .
ड्रेस भत्ता : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना दिला जाणारा ड्रेस भत्त्यामध्ये सातवा वेतन आयोगानुसार (7th Pay commission ) DA मधील वाढीमुळे दि.01 जुलै 2024 पासून पूर्वलक्षी प्रभावाने सदर भत्त्यातील वाढ लागू करण्यात येणार आहे .
इतर भत्त्यामध्ये देखील होणार वाढ : याशिवाय महागाई भत्त्याचे दर 50% पेक्षा अधिक झाल्याने , इतर देय असणारे भत्ते यामध्ये घरभाडे भत्ता , वाहन भत्ता अशा भत्त्यामध्ये देखील वाढ करण्याची शिफारस केंद्रीय वित्त मंत्रालय कडे करण्यात आलेली आहे .
- राज्य वेतन सुधारणा समिती खंड – 2 मधील सुधारित वेतनश्रेणी या पदांस लागु ; शासन निर्णय निर्गमित दि.03.02.2025
- आता राज्यात सरकारी / निमसरकारी कार्यालयात मराठी भाषाचा वापर अनिवार्य ; अन्यथा होणार कारवाई , GR निर्गमित दि.03.02.2025
- काही महत्वपुर्ण चालु घडामोडी ; जाणून घ्या सविस्तर !
- NPS धारक कर्मचाऱ्यांच्या संदर्भात वित्त विभागाचा महत्वपुर्ण शासन निर्णय ; पाहा सविस्तर !
- राज्य कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी महिन्यात मिळणार हे 3 लाभ ; जाणून घ्या सविस्तर !