राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर ; वेतनत्रुटी निवारण समितीच्या अहवालानुसार लवकरच सुधारित वेतनश्रेणी लागु होणार !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ According to the report of the Pay Deficit Redressal Committee, the revised pay scale will be implemented soon. ] : राज्य कर्मचाऱ्यांसाठी  आत्ताची मोठी खुशखबर समोर येत आहे , ती म्हणजे सातव्या वेतन आयोगातील वेतनत्रुटी असणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना सुधारित  वेतनत्रुटी लागु केली जाणार आहे .

वेतनत्रुटी : सातव्या वेतन आयोगांमध्ये अनेक पदांच्या वेतनश्रेणींमध्ये त्रुटी आढळून आलेल्या होत्या , असे अधिकारी / कर्मचारी आपल्याला न्याय मिळावा याकरीता न्यायालयांमध्ये धाव घेतली होती . न्यायालयांमध्ये अशा वेतनत्रुटी असणाऱ्या पदांचे मोठ्या प्रमाणात याचिका सादर झाल्याने , न्यायालयाने राज्य सरकारला दिलेल्या निर्देशानुसार ..

वेतनत्रुटी निवारण समितीचे गठण करुन , सदर वेतनत्रुटी असणाऱ्यांना पदांचे अभ्यास करुन सुधारित वेतनश्रेणीची शिफारस राज्य सरकारला करण्यात आलेले आहेत . सदर शिफारशीस राज्य सरकारच्या मंजूरीनंतर सातव्या वेतन आयोगातील त्रुटी असणाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणीचा लाभ मंजूर करण्यात येणार आहे .

हे पण वाचा : शासकीय सुट्टीची दिवशी मुख्यालय न अधिकारी / कर्मचाऱ्यांना निर्देश ; GR निर्गमित दि.24.04.2025

आठवा वेतन आयोग : सन 2026 पासुन आठवा वेतन आयोग लागु होणार असल्याने , त्या अगोदरच सातवा वेतन आयोगातील त्रुटींचे निवारण केले जाणार आहेत . याकरीता राज्य सरकारकडे हालचाली सुरु आहेत .

वेतनत्रुटी निवारण समिती अहवालास कधी मंजुरी : वेतनत्रुटी निवारण समिती अहवालास आठवा वेतन आयोगापुर्वीच म्हणजेच माहे डिसेंबर 2025 पर्यंत मंजूरी दिली जाईल . कारण दिनांक 01.01.2026 नंतर आठवा वेतन आयोग लागु होईल , त्या अनुषंगाने राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतनत्रुटीचे निवारण हे या वर्षीच्या अखेर पर्यंत होणार आहे .

Leave a Comment