@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ A decision will be taken on these 02 pending proposals of the employees after the salary deficit of the state employees is resolved. ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतनत्रुटी निवारण समितीच्या अहवालातील शिफारशी राज्य सरकारने काल दिनांक 13 मे रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत मंजूरी देण्यात आली .
सदर निर्णयानंतर आता राज्य कर्मचाऱ्यांच्या इतर 02 प्रलंबित प्रस्तावित मागणीवर सकारात्मक निर्णय होणार आहे . सदर प्रस्तावित मागण्या कोणत्या आहेत , ते पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
01.सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे : राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे 58 वर्षे वरुन 60 वर्षे करण्याची राज्य कर्मचाऱ्यांची बऱ्याच दिवसांची मागणी आहे , सदर मागणीवर राज्य सरकारकडून प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे , परंतु सदर प्रस्तावाला काही आमदार व स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थी संघटनांकडून विरोध दर्शविल्याने , सदर निर्णय अद्याप रखडला आहे .
हे पण वाचा : सहाय्यक प्राध्यापक , लिपिक , शिपाई पदासाठी थेट पदभरती !
परंतु राज्यातील तब्बल 17 लाख कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी , सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणेबाबत सरकारकडून लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याची शक्यता आहे . शिवाय कर्मचारी संघटना मार्फत वेळोवेळी याबाबत पाठपुरावा करण्यात येत आहे .
02.महागाई भत्ता वाढ : केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी व पेन्शन धारक तसेच इतर पात्र कर्मचाऱ्यांना दिनांक 01.01.2025 पासुन 02 टक्के डी.ए वाढ लागु करण्यात आलेली आहे , याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना डी.ए वाढ लागु करणेबाबत , माहे जुलै महिन्यांच्या अखेर पर्यंत निर्णय घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत .
या निर्णयामुळे राज्य कर्मचाऱ्यांचा एकुण महागाई भत्ता हा 53 टक्के वरुन 55 टक्के इतका होईल , यांमध्ये माहे जानेवारी महिन्यांपासुनची डी.ए थकबाकीची रक्कम देखिल अदा करण्यात येईल .
- राज्य कर्मचाऱ्यांच्या रजा नियमांमध्ये सुधारणा ; वित्त विभाग शासन अधिसूचना दि.28.01.2025
- राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.31 डिसेंबर रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय !
- Good News : सरकारी कर्मचाऱ्यांचा जानेवारी मध्ये परत 02% DA वाढ ; एकुण महागाई भत्ता 60 टक्के होणार !
- DA : केंद्राच्या धर्तीवर महागाई भत्ता 58% दराने लागू करणेबाबत शासन निर्णय (GR)
- कर्मचारी / पेन्शन धारकांना नविन वेतन आयोगांमध्ये कोण-कोणते फायदे मिळणार ? जाणून घ्या सविस्तर !