@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ E-Nam Scheme ] : कृषी मालाच्या विक्री करीता देशांमध्ये एक देश एक बाजारपेठ ही संकल्पना विचारात घेवून राष्ट्रीय कृषी बाजार ( ई- नाम ) ह्या योजनाची सुरुवात करण्यात आलेली आहे . देशातील कृषी बाजार पेठ यांचे एकत्रीकरणांमधून ऑनलाईन मोर्कट मंच स्थापित करुन कृषी मालाची विक्रीकरीता संपुर्ण देशांमध्ये एकच मंच स्थापित करण्याच्या उद्देशाने सदर ई-नाम योजनांची सुरुवात करण्यात आलेली आहे .
राष्ट्रीय कृषी बाजार हे सरकारचे एक नाविन्य पुर्ण असा उपक्रम आहे , त्यांमध्ये शेतकरी डिजिटल पद्धतीने देशातील अनेक बाजार पेठांमध्ये आपल्या उत्पादनांची विक्री करु शकेल , ज्यामुळे देशभरातील खरेदीदारांना या प्लॅटफॉर्मवर आपले कृषी माल विक्री करु शकणार आहेत . ज्यामुळे शेतकऱ्यांना कृषी मालाची योग्य व चांगली किंमत मिळण्यास मदत होईल , तसेच सदर कृषी माल हे देशातील अधिकाधिक बाजार पेठांमध्ये पोहोचण्यास मदत होणार आहेत .
नेमके हे प्लॅटफॉर्म काय आहे ? – या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातुन , ऑनलाईन पोर्टलवर आपले सर्व प्रकारचे कृषी माल हे अपलोड करु शकतील , तर या कृषी मालाला सदर पोर्टलवरुन देश भरातील व्यापारी सदर कृषी माल खरेदी करता बोली लावतील . यामुळे शेतकऱ्यांना जास्त किंमतीस आपले कृषी माल विक्रीस मदत होईल .
ई-नाम पोर्टलवर आपले कृषी माल अपलोड करण्यासाठी ई-नाम पोर्टलला भेट देवू शकता अथवा 18002700224 या टोल फ्री नंबरवर कॉल करु शकता . जर आपणांस याविषयी अधिक माहिती अथवा कृषी माल अपलोड करण्यासाठी काही अडचणी येत असल्यास आपल्या प्रादेशिक कृषी उत्पन्न समिती बाजार पेठांच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करु शकता ..
ई-नाम पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अधिक माहिती साठी CLICK HERE