@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ New Education Pattern ] : येत्या जुन महिन्यांपासून देशात / राज्यात नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागु करण्यात येणार आहेत , सदर शैक्षणिक धोरणानुसार शैक्षणिक क्षेत्रांमध्ये अमुलाग्र बदल करण्यात आलेले आहेत . यांमध्ये आता यापुढे 12 वी नंतर 4 वर्षांच्या पदवी शिक्षणांमध्ये पदवी वर्षानुसार डिप्लोमा व पदव्युत्तर पदवी एकाच वेळी विद्यार्थ्यांना प्राप्त होणार आहे .
सध्या आपल्याला पदवी घ्यायची असल्यास तीन वर्षांचा अवधी लागतो , तर नविन शैक्षणिक धोरणामध्ये आता पदवीच्या प्रथम वर्षाला ॲडमिशन घेतल्याच्या नंतर पदवीचे पहिले वर्ष यशस्वीरित्या उत्तीर्ण झाल्याच्या नंतर एक वर्षाकरीताचे स्वतंत्र प्रमाणपत्र दिले जातील , त्यानंतर 2 वर्षे पुर्ण केल्यानंतर शिक्षण सोडल्यास सदर विद्यार्थ्यांस डिप्लोमाचे प्रमाणपत्र दिले जातील .
तर पदवीच्या तिसऱ्या वर्षाच्या नंतर काही कारणास्तर विद्यार्थ्यांने शिक्षण सोडल्यास , त्यास सध्याच्या प्रचलित नियमानुसार पदवी प्रमाणपत्र दिले जाईल , तर चौथ्या वर्षाच्या पदवीचे अभ्यासक्रम उत्तीर्ण झाल्यास त्यास ऑनर्स / रिसर्च पदवी मिळेल . ज्याच्यानंतर पदव्युत्तर पदवी करीता थेट दुसऱ्या वर्षासाठी प्रवेश मिळेल , तर पदवीच्या तीन वर्षानंतर शिक्षण सोडल्यास त्यास पदव्युत्तर पदवी करीता 2 वर्षे द्यावे लागेल .
तर सलग 4 वर्षे पदवी अभ्यासक्रम पुर्ण केल्यानंतर मात्र चौथ्या वर्षाच्या नंतर पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्ष करीता ॲडमिशन मिळेल . यामुळे विद्यार्थ्यांचे कोणतेही वर्ष यापुढे वाया जाणार नाहीत , या अगोदर पदवीच्या 1 व दुसऱ्या वर्षाच्या उत्तीर्णला कोणतेही महत्व नव्हते , परंतु नविन शैक्षणिक धोरणानुसार पदवीच्या सर्व वर्षाला महत्व व प्रमाणपत्र देण्याची तरतुद करण्यात आली आहे .
मात्र डी.एड आणि बी-एड प्रवेश प्रक्रिया ही पुर्वीप्रमाणे असणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहेत , सदरचे नविन राष्ट्रीय धोरण येत्या सन 2024-25 या शैक्षणिक वर्षांपासून अंमलबजावणी करण्यासाठी सर्वपरि शिक्षण मंत्रालयास सूचित करण्यात आलेले आहेत .
-
सरकारी कर्मचाऱ्यांना 40 दिवसांच्या अतिरिक्त वेतन बोनससह , वाढीव भत्ताचा लाभ !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ government employee extra pay bonus and mahagai Bhatta ] : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना 40 दिवसांचे अतिरिक्त वेतन बोनससह , वाढीव महागाई भत्ताचा लाभ अनुज्ञेय करण्यात आलेला आहे . यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या एकुण सॅलरीमध्ये मोठी वाढ झालेली आहे . सदरचा 40 दिवस बोनस चा लाभ सैन्य दलातील अधिकारी /…