@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ rain update news ] : सध्या वातावरणात बदल झाला असून , पुढील 24 तासांमध्ये राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे .
अचानक वातावरणामध्ये धुक्यांची स्थिती व ढगाळ वातावरण तयार झाल्याने , राज्यातील काही भागांमध्ये किरकोळ स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे .
या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता : पुढील 24 तासांमध्ये राज्यातील नवी मुंबई , ठाणे, मुंबई त्याचबरोबर कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे .
तर या दरम्यानच्या काळात मुंबईचा तापमान कमाल 32 तर किमान 19 अंश सेल्सियस दरम्यान असण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे . याशिवाय उत्तर महाराष्ट्र , विदर्भ या भागातील वातावरणात बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे .
यामध्ये धुळे , जळगाव, नाशिक या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे . याशिवाय पश्चिम महाराष्ट्र , पुणे या भागामध्ये तापमान कोरडे राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे .