गिरीश महाजन यांनी डॉ. बाबासाहेबांचे नाव न घेतल्याने , झालेल्या वादावरून माधवी यांचे निलंबन होणार का ?  पाहा सविस्तर नियम !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Madhavi Jadhav ] : 26 जानेवारी च्या निमित्ताने ध्वजारोहण दरम्यान नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन हे भाषण देत असताना,  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने , संताप व्यक्त करत वनरक्षक श्रीम.माधवी जाधव यांनी नाराजगी व्यक्त केली .

एखाद्या कर्मचाऱ्यांनी अशा प्रकारची वागणे हे महाराष्ट्र नागरी सेवा नियमाच्या विरुद्ध आहे , असे अनेकांचे म्हणणे आहे . यामुळे माधवी जाधव यांना निलंबनास सामोरे जावे लागेल का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे .

एखाद्या सरकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या वरिष्ठांशी या प्रकरणी गिरीश महाजन हे पालकमंत्री या नात्याने वरिष्ठ पद धारण केलेली व्यक्ती आहे . यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार , वरिष्ठांशी सौम्य भाषेमध्ये संवाद साधने आवश्यक आहे .

यामुळे नियमानुसार माधवी जाधव यांच्यावर कार्यवाही होऊ शकते , याशिवाय सध्या सोशल मीडियावर माधवी जाधव हे आपले मत व्यक्त करीत आहे हे देखील एक प्रकारचे सरकारी कर्मचाऱ्यांनी सोशल मीडिया वापर संदर्भात नियमाचे उल्लंघन होत असल्याचे अनेकांचे मत आहे .

नाशिकचे मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने घेणे बंधनकारकच होते . परंतु माधवी जाधव सरकारी कर्मचारी म्हणून यांनी त्यांच्यावर रोष व्यक्त करणे हे चुकीचे असल्याचे बोलले जात आहे .माधवी जाधव यांना नियमानुसार वरिष्ठांची नोटीस प्राप्त झाली आहे .

Leave a Comment