महसुल विभाग मार्फत 11 मोठे महत्वपुर्ण निर्णय निर्गमित ; जाणून घ्या सविस्तर निर्णय !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ 11 major important decisions issued by the Revenue Department ] : महसुल विभाग मार्फत 11 मोठे महत्वपुर्ण निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत . सविस्तर निर्णय पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .

01.वाळू रेती धोरण : राज्यातील वाळु – रेतीच्या व्यवस्थापन करीता नवीन वाळु – रेती धोरण 2025 लागु करण्यात आले आहेत . ज्यांमध्ये वाळु डेपो बंद करण्यात येणार असुन यापुढे लिलाव पद्धतीने वाळुची विक्री केली जाणार आहे .

02.10 टक्के वाळु घरकुल करीता राखीव : घरकुल बांधकाम करीता 10 टक्के वाळु हा राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे गरजु नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे .

03.शेतकऱ्यांना बंदोबस्त : शेतकऱ्यांच्या हित करीता शेतरस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम अधिक प्रभावीपणे करण्यात येत आहे . याकरीता पोलिस बंदोबस्त मोफत उपलब्ध करुन देण्यास मंजूरी देण्यात आली आहे . याशिवाय शेतकऱ्यांच्या खासगी शेतरस्त्यांची 7/12 वर नोंदी करुन कायदेशीरित्या मान्यता दिली जाणार आहे .

04.जिवंत 7/12 :  मयत खातेदारांच्या नावे त्यांच्या वारसांची नोंदी करण्याचा महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आला आहे .

05.जन्म – मृत्यु प्रमाणपत्र कायदा मध्ये सुधारणा : जन्म / मृत्यु प्रमाणपत्राच्या कायद्यांमध्ये मोठी सुधारणा करण्यात आली आहे .यानुसार बोगस प्रमाणपत्रांना आळा घातला जाणार आहे .

06.वाळु रॉयल्टी : घरकुल योजना अंतर्गत लाभार्थ्यांना घरपोच वाळू देण्यासाठी वाळु रॉयल्टी मोफत करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे .

07.माझी जमीन माझा हक्क अभियान : सदर माझी जमीन माझा हक्क अभियान अंतर्गत सलोखा योजनेस मुदतवाढ दिली असून , याकरीात राज्यस्तरीय समितीचे गठण करण्यात आले आहे .

08.नक्श प्रकल्प : शहरी भागांमध्ये जमीनीच्या नकाशांची अचुकता करीता नक्शा हा डिलिटल प्रकल्पास मान्यता देण्यात आलेली आहे .

09.शैक्षणिक दस्तऐवज वरील मुद्रांक शुल्क माफ करण्यास व 500/- रुपये स्टॅम्प रद्द करण्यास मान्यता .

10.छ.शिवाजी महाराज महाराजस्व महसुल समाधान शिबिर अंतर्गत गावोगावे शिबिरे घेवून वारस नोंदी , अतिक्रमणे , फेरफार यासारखे प्रकरणे गावांमध्येच निकाली काढले जाणार आहेत .

11.एक राज्य एक नोंदणी : या अभियान अतंर्गत राज्यातील कोणत्याही उपनिबंधक कार्यालयांमध्ये नोंदणी करता येणार आहे . तसेच यापुढे ई-मुद्रांक प्रमाणपत्रेही आता ऑनलाईन पद्धतीने मिळणार आहेत .

Leave a Comment