कोण करु शकतो टपाली मतदान ? जाणुन घ्या सविस्तर !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : जे नागरिक प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जावून मतदान करु शकणार नाहीत , अशांना टपाली पद्धतीन मतदान करण्याची सुविधा उपलब्‍ध करुन देण्यात आलेली आहे . तसेच जे नागरिक इतर ठिकाणी कामानिमित्त गेलेले आहेत , अशांना एक दिवसाची भरपगारी सुट्टी उपलब्ध करुन देण्यात येते .

टपाली मतदान सर्वच नागरिक करु शकत नाहीत , जे मतदार इतर जिल्हांमध्ये शासकीय / निमशासकीय कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत व त्यांना मतदान कामकाजांमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत , अशांना टपाली पद्धतीने मतदान करता येतो , त्याचबरोबर अत्यावश्यक सेवा मध्ये कार्यरत असणारे शासकीय / निमशासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या आस्थापना कार्यालयामार्फत पत्रव्यवहार करुन टपाली मतदान करु शकतात .

वयोवृद्ध व दिव्यांग मतदार : या वर्षीपासून वयोवृद्ध तसेच दिव्यांग मतदारांना घरी बसून मतदान करता येणार आहेत , याकरीता प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा मतदान अधिकारी मार्फत मतदान टपाली मतदान होणार आहे . ज्यांमध्ये वयोवृद्ध व दिव्यांग मतदारांना अर्ज क्र.12 डी भरावा लागणार आहे .

वयोवृद्ध मध्ये वयाच्या 85 वर्षापलीकडील नागरिकांना ही सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे , अशा प्रकारीच सुविधा वयोवृद्ध / दिव्यांग मतदारांना या वर्षी पहिल्यांदा सुविधा मिळत आहे .

लष्कर दलातील जवान : लष्कर दलातील जवानांना टपाली तसेच ऑनलाईन पद्धतीने मतदान करण्याची सुविधा दिली जाते .

इतर राष्ट्रातील भारतीय नागरिक : इतर देशांमध्ये असणारे भारतीय  नागरिक ज्यांचे भारतीय नागरिकत्व रद्द झालेले नाही असे नागरिक टपाली पद्धतीने मतदान करु शकतात , याकरीता विहीत नमुन्यातील अर्ज भरुन टपाली पद्धतीने मतदान करु शकतील .

अशा प्रकारच्या मतदारांना टपाली पद्धतीने मतदानाचा हक्क बजावता येतो . यामुळे या पद्धतीचा अवलंब करुन मतदान करावेत , जेणेकरुन आपली लोकशाहीला अधिक बळकटी येईल .

Leave a Comment