TET सक्तीच्या विरोधात राज्यात दि.05 डिसेंबर रोजी राज्यभर शाळाबंद आंदोलन व महामोर्चा !

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ School closure protest and grand march across the state on December 5 against mandatory TET. ] : शिक्षक पात्रता परीक्षा सक्तीच्या विरोधात राज्यात दिनांक 05 डिसेंबर 2025 रोजी राज्यभर शाळाबंद आंदोलन व महामोर्चा आयोाजित करण्यात आला आहे .

सदर आंदोलन शिक्षक व शिक्षकेत्तर संघटना समन्वय समितीच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे . या संदर्भात राज्याचे मा.मुख्यमंत्री यांना निवेदन देखिल सादर करण्यात आला आहे .

मा.सर्वोच्च न्यायालयाच्या टीईटी विषयक अनिवार्यतेच्या निर्णयास अनुसरुन प्राथमिक शिक्षकांना संरक्षण देण्याकरीता पुनर्विचार याचिका दाखल करण्यास होत असलेली अनावश्यक विलंब प्रक्रिया तसेच शिक्षण विभाग मार्फत निकालाचा चुकीचा अर्थ घेवून सुरु असणारी कार्यवाही यामुळे ..

राज्यातील शिक्षक वर्गांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजगी पसरली आहे . यामुळे दिनांक 05 डिसेंबर 2025 रोजी राज्यभर शाळा बंद ठेवून जिल्हा मुख्यालयांवर महामोर्चा काढण्यात येणार आहे .

प्रमुख मागण्या : 1) टीईटी निर्णयावरील पुनर्विचार याचिका दाखल करण्यात यावी .

02. टीईटी निकालाचा चुकीचा अर्थ काढून विविध कार्यालयांकडून सुरु असणारी कार्यवाही तात्काळ थांबवावी .

03.महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1982 व  84 अंतर्गत जुनी पेन्शन योजना पुर्ववत लागु करावी .

04. शिक्षण सेवक योजना रद्द करुन नियमित वेतनश्रेणी लागु करावी .

05.शिक्षकांनाही 10 , 20 , 30 वर्षानंतरची सुधारित तीन वेतन लाभाची आश्वासित प्रगती योजना लागु करण्यात यावी .

06.15 मार्च 2024 या संचमान्यता विषयक शासन निर्णय रद्द करण्यात यावा .

07.राज्यातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची बंद असलेली पदभरती तात्काळ सुरु करावी .

08.शिक्षकांवरील विविध अशैक्षणिक व ऑनलाईन उपक्रम तात्काळ थांबवावेत .

09.विषय पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी भेदभाव न करता मंजूर करावी .

10.वस्तीशाळेतील शिक्षकांची सेवा मुळ नियुक्ती तारखेपासुन सर्व लाभांसाठी ग्राह्य धरावी .

11.आश्रमशाळांमध्ये कंत्राटी शिक्षक भरतीचे धोरण रद्द करण्यात यावे .

12.कमी पटाच्या शाळा बंद न करता शिक्षणक्रम सुरु ठेवावेत .

13.शिक्षकांचे इतर सर्व प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवावेत .

Leave a Comment