सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय ; संसदेत दिली माहिती !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Modi government’s important decision regarding leave for government employees; Information given in Parliament. ] : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे . या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना सलग 30 दिवसांची भरपगारी रजा मिळणार आहे .

सरकारी कर्मचाऱ्यांच्या रजे संदर्भात संसदेत प्रश्न विचाराण्यात आलेला होता , सदर प्रश्नांला केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी दि.24.07.2025 रोजी राज्यसभेत माहिती दिली आहे . यांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना 30 दिवसापर्यंत पगारी रजा घेता येईल .

पगारी रजा प्रयोजन : पगारी रजा ही वैयक्तिक कामाकरीता घेता येते , परंतु वैयक्तिक कामाचे स्वरुप लक्षात घेता सदर रजा मंजूर करता येते . या प्रयोजन मध्ये आता आई – वडीलांची काळजी घेण्यासाठी पगारी रजा घेता येईल अशी बाब नमुद करण्यात आलेली आहे .

हे पण वाचा : ऑगस्ट पेड इन सप्टेंबर वेतन बाबत आत्ताची मोठी अपडेट ; मंत्र्याकडून महत्वपुर्ण निर्देश !

सरकारी कर्मचाऱ्यांना वयोवृद्ध आई-वडीलांची काळजी घेण्यासाठी विशेष सुट्टी घेता येणार आहे . तर सदर सुट्टीच्या काळात कर्मचाऱ्यांना वेतन देखिल अदा करण्यात येणार आहेत . ही एक पगारी रजा असणार आहे . या विशेष प्रयोजनामुळे कर्मचाऱ्यांकडून स्वागत करण्यात आले आहेत .

वयोवृद्ध आई-वडीलांची देखभालीच्या रजेबाबत : सदर 30 दिवसापर्यंत रजा ही सरकारी कर्मचाऱ्यांना आई-वडीलांची सेवा करण्यासाठी घेवू शकतील . सदरची रजा ही केंद्रीय सेवा नियम 1972 अंतर्गत मिळणार आहे .

Leave a Comment