@marathiprasar चंदना पवार प्रतिनिधी [ Adverse effects of English medium schools ] : सध्या राज्यातच नव्हे तर देशातच इंग्रजी माध्यमांच्या शाळांना मोठी पसंती दिली जात आहे . कारण देशांमध्ये स्वदेशी भाषांपेक्षा इंग्रजीचे महत्व अधिक आहे .
आपल्या देशांमध्ये काही लोकं इंग्रजीमध्ये बोलतील पण आपल्या स्वदेशी हिंदी भाषेचा विरोध करतील , हे वास्तव असल्याने , मराठी माध्यम शाळांचे महत्व कमी होत आहे . परिणामी इंग्रजी माध्यमांकडे मुलांचा ओढा अधिक आहे .
इंग्रजी केवळ भाषा ज्ञान नव्हे : इंग्रजी ही केवळ एक भाषा आहे , तर ज्ञान नव्हे ! हे पालकांनी लक्षात घ्यायला हवे . लहानपणी मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिकवले जाते . तर अनेक शाळा ह्या सकाळी 7 ते सायंकाळी 5 पर्यंत भरतात , यामुळे मुलांचे लहानपण हळू हळू हरवत आहे .
आपण महाराष्ट्रात राहतो तर आपणांस मराठी भाषा , हिंदी भाषा याशिवाय इंग्रजी भाषा अनिवार्यतेने शिकावी लागते . यामुळे ज्ञानापेक्षा आपणांस भाषा शिकविण्यावर अधिक भर द्यावा लागतो . देशांमध्ये पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना देखिल स्पष्ट इंग्रजी संभाषण करता येत नाही . तरी देखिल इंग्रजी भाषेची अनिवार्यता का भासत असेल ? या प्रश्नाचे उत्तर म्हणजे सध्याची परिस्थिती होय .
बऱ्याच इंग्रजी माध्यमांच्या शाळा ह्या LKG , UKG मध्ये मुलांना इंग्रजी लादण्याचा प्रयत्न करताता , यामुळे मुले देखिल दबावाखाली इंग्रजी शिकत असतात . लहान वयातील दबावामुळे त्यांच्या ज्ञानांमध्ये भविष्यात हवी तशी वृद्धी दिसून येत नाही . यामुळे मुलांना लहान वयात स्वछंद आयुष्याचा आनंद घेवू द्यात असे काही तज्ञांचे मत आहे .
खऱ्या अर्थाने विद्यार्थी दशा ही इयत्ता 3 री पासुन पुढे असते , यामुळे लहान वयातच मुलांना इंग्रजी अफाट ज्ञान , ज्यादा तासिका लावण्याचा प्रयत्न करु नये , असे बऱ्याच शिक्षणतज्ञांचे मत आहे .
- राज्य कर्मचाऱ्यांना 3 वर्षातुन 10 दिवस मिळते या कामासाठी पगारी रजा ; जाणून घ्या वित्त विभागाचा शासन निर्णय !
- जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकरीता महत्वपुर्ण राजपत्र निर्गमित दि.18.07.2025
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय ; संसदेत दिली माहिती !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !