राज्यातील पेन्शनधारकांसाठी सा. प्र. विभागाचा अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय ( GR) ; जाणून घ्या सविस्तर !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ state pensioners IMP Shasan Nirnay ] : राज्यातील पेन्शन धारकांसाठी सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 23 जून 2017 रोजी महत्त्वपूर्ण GR ( शासन निर्णय) निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर शासन निर्णयानुसार ( GR) , नमूद करण्यात आलेली आहे ,  सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या नंतर कार्यालयामध्ये निवृत्ती विषयक लाभ तसेच त्या अनुषंगिक बाबी करिता ये – जा करण्याकरिता , याशिवाय शासकीय कार्यालय , बँका , रेल्वे अशा सार्वजनिक ठिकाणी सन्मानाची वागणूक मिळावी …

याकरिता निवृत्तीवेतनधारकांना कायमस्वरूपी ओळखपत्र देण्याची तरतूद राज्य सरकारकडून करण्यात आलेली आहे . सदर शासन निर्णयामध्ये ओळखपत्राचा नमुना विहित करण्यात आलेला आहे .GR व नमूना पुढीप्रमाणे पाहू शकता..

हे पण वाचा : भारतीय स्टेट बँकेत 2,964 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

या ओळखपत्रांमध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे नाव , त्याने धारण केलेले शेवटचे पद  , आधार कार्ड क्रमांक , ओळखपत्र क्रमांक सदर निवृत्तीवेतनधारकांचे छायाचित्र  , रक्ताचा गट,  मोबाईल नंबर , विशेष आजार , पत्ता या बाबी सदर ओळखपत्रांमध्ये नमूद आहेत .

सदर शासन निर्णयानुसार संबंधित प्रशासकीय कार्यालयाने निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर वरील नमूद निर्णयातील ओळखपत्र नमुन्यानुसार ओळखपत्र देण्याचे व त्यामागे राज्य शासनाचा गोल शिक्का देणे बंधनकारक  असणार आहे .

Leave a Comment