01 रुपयांत पिक विमा योजना बंद ; आता खरीप हंगामात पिकनिहाय प्रति हेक्टर इतकी विमा रक्कम भरावी लागणार !

Spread the love

@marathiprsar खुशी पवार प्रतिनिधी [ Crop insurance scheme closed at Rs. 01 ] : एक रुपयांमध्ये पिक विमा योजना बंद करण्यात आली असून यापुढे आता खरीप हंगामापासुन सुधारित पिक विमा योजना लागु करण्यात येत आहे .

आता शेतक-यांना ओळख क्रमांक व ई – पीक पाहणी करुन ऑनलाईन पद्धतीने पिक विमा भरता येणार आहे .  तर सुधारित दरानुसार खरीप हंगामासाठी दिनांक 01 जुलै ते 31 जुलै 2025 पर्यंत पिक विमा भरावा लागणार आहे .

पिकनिहाय प्रति हेक्टर किती रक्कम भरावी लागणार ? :

अ.क्रपिकाचे नावभरावी लागणारी विमा रक्कम
01.सोयाबीन1160/-
02.कपाशी900/-
03.तुर470/-
04.मक्का90/-
05.मुंग70/-
06.उडीद62/-
07.ज्वारी82/-

हे पण वाचा : वाढती लोकसंख्या व प्रशासकीय सोईसाठी महाराष्ट्रात हे 21 नविन जिल्हे निर्मिती होणार ; जाणून घ्या सविस्तर यादी !

वरील प्रमाणे प्रति हेक्टर विमा रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागणार आहे , विमा भरण्याचा अंतिम दिनांक हा दिनांक 31 जुलै 2025 असणार आहे. विमा भरण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक ( ॲग्रीस्टॅक ) व ई- पिकपाहणी सक्तीची करण्यात आलेली आहे .

सदर विमा योजना शेकऱ्यांसाठी ऐच्छिक असून , सन 2025-26 करीता वरील रक्कम दिनांक 31 जुलै पर्यंत भरुन आपल्या पिकाचा विमा उतरवायचा आहे . पिकांची नुकसान झाल्यास , नुकसानीच्या 70 टक्के विमा रक्कम मिळते .

Leave a Comment