@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ According to the report of the Pay Deficit Redressal Committee, the revised pay scale will be implemented soon. ] : राज्य कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी खुशखबर समोर येत आहे , ती म्हणजे सातव्या वेतन आयोगातील वेतनत्रुटी असणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनत्रुटी लागु केली जाणार आहे .
वेतनत्रुटी : सातव्या वेतन आयोगांमध्ये अनेक पदांच्या वेतनश्रेणींमध्ये त्रुटी आढळून आलेल्या होत्या , असे अधिकारी / कर्मचारी आपल्याला न्याय मिळावा याकरीता न्यायालयांमध्ये धाव घेतली होती . न्यायालयांमध्ये अशा वेतनत्रुटी असणाऱ्या पदांचे मोठ्या प्रमाणात याचिका सादर झाल्याने , न्यायालयाने राज्य सरकारला दिलेल्या निर्देशानुसार ..
वेतनत्रुटी निवारण समितीचे गठण करुन , सदर वेतनत्रुटी असणाऱ्यांना पदांचे अभ्यास करुन सुधारित वेतनश्रेणीची शिफारस राज्य सरकारला करण्यात आलेले आहेत . सदर शिफारशीस राज्य सरकारच्या मंजूरीनंतर सातव्या वेतन आयोगातील त्रुटी असणाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणीचा लाभ मंजूर करण्यात येणार आहे .
आठवा वेतन आयोग : सन 2026 पासुन आठवा वेतन आयोग लागु होणार असल्याने , त्या अगोदरच सातवा वेतन आयोगातील त्रुटींचे निवारण केले जाणार आहेत . याकरीता राज्य सरकारकडे हालचाली सुरु आहेत .
वेतनत्रुटी निवारण समिती अहवालास कधी मंजुरी : वेतनत्रुटी निवारण समिती अहवालास आठवा वेतन आयोगापुर्वीच म्हणजेच माहे डिसेंबर 2025 पर्यंत मंजूरी दिली जाईल . कारण दिनांक 01.01.2026 नंतर आठवा वेतन आयोग लागु होईल , त्या अनुषंगाने राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतनत्रुटीचे निवारण हे या वर्षीच्या अखेर पर्यंत होणार आहे .
- राज्यातील पेन्शनधारकांसाठी सा. प्र. विभागाचा अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय ( GR) ; जाणून घ्या सविस्तर !
- 01 रुपयांत पिक विमा योजना बंद ; आता खरीप हंगामात पिकनिहाय प्रति हेक्टर इतकी विमा रक्कम भरावी लागणार !
- सरकारी / निमसरकारी / महामंडळे मधील कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मुलास नॉन क्रिमिलेअर अंतर्गत आरक्षणाचा लाभ घेवू शकतो का ?
- दिनांक 25 ते 28 जुन दरम्यान पाऊसमान अंदाज : जाणून घ्या सविस्तर !
- सरळसेवा पदभरती प्रक्रिया मध्ये किमान पर्सेंटाईल अर्हतामान लागु ; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय ! जाणून घ्या सविस्तर परिपत्रक !