@marathiprasar पुजा पवार प्रतिनिधी : राज्यात शेतकऱ्यांना हाय टेक कृषी प्रकल्प यांमध्ये ग्रीन हाऊस , पॉलीहाऊस तसेच शेड नेट / प्रि कुलिंग / कोल्ड स्टोरेज इत्यादी बांधणीकरीता मुदत कर्ज उपलब्ध करुन दिले जाते . बँक ऑफ महाराष्ट्र ही एक राज्यातील शेतकऱ्यांना कर्जे देण्याकरीता अग्रगण्य बँक असून , या बँकेमार्फत शेतकरी हिताचे विविध कर्जे सुविधा उपलब्ध करुन देण्यात येते .
या कर्जे योजनेचा मुख्य उद्देश : महाराष्ट्र बँकेमार्फत हाय टेक प्रोजेक्ट्स देण्याचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना ग्रीन हाऊस , पॉलिहाऊस , शेड नेट तसेच प्रि कुलिंग , कोल्ड स्टोरेट इत्यादी कृषी प्रकल्प उभारणीकरीता अर्थपुरवठा करणे ..
पात्रता / मिळणारी कर्जाची रक्कम : या मुदत कर्जे योजना अंतर्गत सर्वच शेतकरी तसेच वैयक्तिक तसेच संयुक्त भुधारक आवेदन सादर करु शकतील . सदर योजना अंतर्गत मिळणारी कर्जे रक्कम ही प्रकल्प खर्च / अंदाजानुसार आधारीत असते .
व्याजदर ( Rate of Intrest ) : या योजना अंतर्गत शेतकऱ्यांना वरील उद्देशाकरीता 10 लाख रुपये पर्यंत 1 वर्षे MCLR + 0.50% +2% इतका व्याजदर असेल , तर 10 लाख रुपयांपेक्षा अधिक कर्जावरती , 1 वर्षे MCLR + 0.50% +3% इतका व्याजदर लागु होईल .
परतफेडीचा कालावधी ( Loan Repayment Period ) : या मुदत कर्जे ( हाय – टेक प्रोजेक्ट्स ) करीता कर्जाची परफेडीचा कालावधी हा 5 वर्षे ते 09 वर्षे इतक्या कालावधी करीता असेल .
आवश्यक असणारे कागदपत्रे ( Document ) : सदर वरील उद्देशाकरीता मुदत कर्जे करीता शेतकऱ्यांना कर्ज नमुना , बीघाड बी- 2 , 7/12 , आठ अ उतारा , इतर वित्तीय संस्था बँकांची थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र , कर्ज हमीपत्र इ.
लाभ कसा घ्याल : सदर योजनांच्या माध्यमातुन लाभ घेण्याकरीता आपल्या जवळील बँक ऑफ महाराष्ट्र च्या शाखेस भेट देवून लाभ प्राप्त करु शकता ..