दुधाळ संकरीत गाई व म्हशीचे वाटप योजना अंतर्गत लाभार्थ्यांस अनुदान वितरण ; GR निर्गमित दि.15.03.2024

Spread the love

@marathiprasar खुशी पवार : दुधाळ संकरीता गाई व म्हशीचे वाटप योजना अंतर्गत लाभार्थ्यांस अनुदान वितरण करणेबाबत , सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागांकडून दिनांक 15 मार्च 2024 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

वैयक्तिक रित्या लाभ घेणाऱ्या अनुसुचित जाती प्रवर्ग मधील लाभार्थ्यांस दुधाळ संकरित गाई आणि म्हशीचे वाटप योजना अंतर्गत सन 2023-24 करीता निधीचे वितरण करणेबाबत सदर शासन निर्णयानुसार मंजूरी देण्यात आली आहे . सन योजना अंतर्गत सन 2023-24 करीता एकुण 2720.95 लाख रुपये इतका निधी अर्थसंकल्पीत असून सुधारित अंदाजानुसार 1904.67 लाख रुपये इतका निधी उपलब्ध आहे , त्यातील एकुण 544.18 लाख रुपये इतका निधी आतापर्यंत वितरीत करण्यात आलेला आहे ..

वित्त विभागाच्या दिनांक 12 एप्रिल 2023 रोजीच्या परिपत्रकानुसार सन 2023-24 या आर्थिक वर्षांकरीता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून देण्यात आलेली आहे . वैयक्तिक लाभार्थ्यांना दुधाळ संकरित गाई व म्हशीचे वाटप करणे या योजना करीता अनुसुचित जाती या प्रवर्गातील लाभार्थ्यांना वित्त विभागांकडून मिळालेल्या मान्यतेनुसार , 800.00 लाख रुपये इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणुन सचिव कृषी व पदुम विभाग मुंबई यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरीत करण्यास मंजूरी प्रदान करण्यात येत आहेत .

सदरील निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरीत करण्यात आलेली आहे , राज्याची आर्थिक स्थिती अतिशय गंभीर स्वरुपाची राहण्याची शक्यता असल्या कारणाने सदर वितरीत निधी खर्च करतांना काटकसरीच्या उपाय योजना करुन खर्च करण्याचे निर्देश सदर शासन निर्णयान्वये देण्यात आलेले आहेत .

या शासन निर्णयांमुळे ज्या लाभार्थ्यांना सदर योजना अंतर्गत लाभ अनुज्ञेय झालेले आहेत , परंतु निधी उपलब्ध नसल्याने आर्थिक सहाय्य मिळाले नाहीत , अशांना आता आर्थिक सहाय्य उपलब्ध होणार आहेत . या संदर्भातील निर्गमित GR पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

Leave a Comment