निवडणुकीत महायुतीने दिलेल्या आश्वासनांची पुर्तता लवकरच ; पेन्शन वृद्धी , शेतकरी सन्मान राशी तसेच लाडकी बहीणींच्या सन्मान राशीत वाढ ..

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ The promises made by the Mahayuti in the elections will be fulfilled soon ] : निवडणुकीच्या धर्तीवर महायुती पक्षांने दिलेल्या आश्वासनांची पुर्तता लवकरच करण्यात येणार आहेत , याकरीता आताच्या अधिवेशनांमध्ये देखिल चर्चा होण्याची शक्यता आहे .महायुतीने दिलेल्या आश्वासनांनुसार पेन्शन वृद्धी , तसेच शेतकरी व लाडकी बहीनींच्या सन्मान राशीमध्ये वाढ होणार आहे .

पेन्शन वृद्धी : वृद्ध नागरीकांना सध्य स्थितीत 1500/- रुपये प्रतिमहा सन्मान राशी ( पेन्शन ) दिली जाते , त्यांमध्ये आणखीन 600/- रुपये वाढ करण्याचे आश्वासन दिल्याने आता सदर वृद्ध नागरीकांना प्रतिमहा 2100/- रुपये पेन्शन दिली जाणार आहे , याकरीता येत्या अर्थसंकल्पात तरतुद केली जाणार आहे .

शेतकरी सन्मान राशी : शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी व नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत एकुण 12000/- रुपये सन्मान राशी दिली जाते , यांमध्ये आणखीण 3,000/- रुपयांची वाढ करण्याचे आश्वासन दिल्याने आता शेतकऱ्यांना 15,000/- रुपये प्रतिवर्षी दिले जाणार आहेत .

लाडकी बहीणींना वाढी रक्कम : लाडकी बहीनींना प्रतिमहा 1500/- रुपये देण्याची तरतुद आहे , परंतु महायुती सरकार परत सत्तेत आल्यास प्रतिमहा 2100/- देण्याचे आश्वासन केले होते . याबाबत सरकारकडून नविन धोरण लवकरच तयार करुन लाडकी बहीनींच्या सन्मान राशीत वाढ करण्यात येणार आहे .

प्राप्त माहितीनुसार , याबाबत लवकरच निर्णय घेवून येत्या अर्थसंकल्पांमध्ये याबाबत तरतुद केली जाणार असल्याचे नमुद करण्यात आले आहेत .

Leave a Comment