गुढीपाडवा व आंबेडर जयंती निमित्त राज्यातील नागरिकांसाठी आनंदाचा शिधा वाटप करणेबाबत , राज्य शासनांचा मोठा निर्णय !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : राज्यातील नागरिकांना गुढीपाडवा व डॉ.बाबासाहेबर आंबेडकर जयंती निमित्त आनंदाचा शिधा वाटप करणेबाबत दिनांक 11 मार्च 2024 रोजी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे  .

दिनांक 09 एप्रिल गुढीपाडवा हा सण आहे तर दिनांक 14 एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेबर आंबेडकर जयंती आहे . या दोन्ही सण / उत्सवाचे औचित्य साधून राज्य शासनांकडून राज्यांमध्ये पात्र लाभार्थी नागरिकांना आनंदाचा शिधा वाटप करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे  .

सदर निर्णया अंतर्गत राज्यातील अंत्योदय अन्न योजना त्याचबरोबर प्रधान्य असणारे कुटुंब त्याचबरेाबर छ.संभाजीनगर व अमरावती या दोन्ही विभागामधील तर नागपुर या विभागामधील वर्धा हा जिल्हा अशा एकुण 14 जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या ग्रस्त जिल्हामधील दारिद्र्य रेषा वरील केशरी शेतकरी शिधापत्रिका धारक यांना रवा , चणादाळ , साखर प्रत्येकी 1 किला या परिमाणात तर 1 लिटर गोडे तेल ( सोयाबिन ) अशा शिधांचा समावेश हा आनंदाचा शिधामध्ये करण्यात आलेला आहे .

या योजना अंतर्गत अंत्योदय अन्न योजनाचे सुमारे 25 लाख तर प्राधान्य कुटुंब अंतर्गत 1.37 कोटी तर शेतकरी योजनामधील 7.5 लाख केशरी शिधापत्रिका धारक असे एकुण 1.69 कोटी शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार आहेत . या आनंदाचा शिधा वाटप करण्यासाठी येणारा तब्बल 550 कोटी 57 लाख रुपये इतक्या खर्चास सदर कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीमध्ये मंजूरी देण्यात आलेली आहे .

Leave a Comment