@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Kotak Kanya Scholarship 2024-25 ] : कोटक महिंद्रा ग्रुप कंपनी व कोटक शिक्षण फाउंडेशनच्या वतीने सदर कोटक कन्या शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते . सदरची शिष्यवृत्ती ही 12 वी नंतर व्यावसायिक शिक्षण करीता देण्यात येते .
पात्रता : सदर योजना अंतर्गत शिष्यवृत्ती घेण्यासाठी विद्यार्थीनी ही भारतातील रहीवाशी असणे आश्यक असेल , तर त्याचे इ.12 वी च्या बोर्ड परीक्षेत 75 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण / समतुल्य अर्हता CGPA असणे आवश्यक असेल . तसेच अर्जदार विद्यार्थीनीच्या पालकांचे मागील वर्षाचे कौटुंबिक उत्पन्न हे 6 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक असेल .
12 वी नंतर त्याने अभियांत्रिकी , एमबीबीएस , बीडीएस , इंटिग्रेटेड एलएलबी सारख्या व्यावसायिक पदवी करीता प्रवेश घेतला असावा . सदरची शिष्यवृत्ती ही कोटक महिंद्रा , कोटक शिक्षण संस्था व Buddy4study च्या कर्मचाऱ्यांच्या मुलांकरीता अर्ज करण्यास पात्र नसणार आहेत .
आर्थिक स्वरुप : निवड झालेल्या विद्यार्थीनीला पुढील शिक्षण पुर्ण होईपर्यंत 1.5 लाख रुपये शिष्यवृत्ती दरवर्षी दिली जाईल .
आवश्यक कागदपत्रे : याकरीता 12 वी चे मार्कशीट , पालकाचे उत्पन्न पुरावा , फी संरचना , बोनाफाईड , आधार कार्ड , बँक पासबुक , घराची छायाचित्रे इ.
अर्ज प्रक्रिया : पात्र / इच्छुक असणाऱ्यांनी आपले आवेदन हे buddy4study.com या संकेतस्थळावर Kotak Kanya Scholarship 2024-25 या वर क्लिक करुन दि.20.12.2024 पर्यंत अर्ज सादर करायचे आहेत .
- शेतकऱ्यांना उपयुक्त व सर्वसमावेशक असे फार्मर ॲप्स व इंटरफेस पोर्टल तयार करण्यास मंजूरी ; GR दि.31.01.2025
- राज्य वेतन सुधारणा समिती खंड – 2 मधील सुधारित वेतनश्रेणी या पदांस लागु ; शासन निर्णय निर्गमित दि.03.02.2025
- आता राज्यात सरकारी / निमसरकारी कार्यालयात मराठी भाषाचा वापर अनिवार्य ; अन्यथा होणार कारवाई , GR निर्गमित दि.03.02.2025
- काही महत्वपुर्ण चालु घडामोडी ; जाणून घ्या सविस्तर !
- NPS धारक कर्मचाऱ्यांच्या संदर्भात वित्त विभागाचा महत्वपुर्ण शासन निर्णय ; पाहा सविस्तर !