इयत्ता 10 वी / 12 वी नंतर करा हे कोर्से ; पुढील उच्च शिक्षणासाठी होईल मोठा फायदा !

Spread the love

इयत्ता 10 वी व 12 वी नंतर पुढील शिक्षणाकरीता उपयोगी असणारी विविध कोर्सेस आजकाल उपलब्ध आहेत . आपल्या वैयक्तिक गुणवृद्धी तसेच आधुनिक जगांसोबत जीवन जगण्यासाठी तसेच करीयर करीता सदर खाली नमुद कोर्सेस  उपयोगी पडणार आहेत .

MSCIT / CCC : महाराष्ट्र राज्य सरकारमार्फत एमएससीआयटी हा कोर्स तर , केंद्र सरकार मार्फत सीसीसी हा कोर्स संगणकाची ओळख व्हावी याकरीता राबविण्यात येत असतो . तसेच आपल्या या कोर्स मध्ये संगणकाची बेसिक ओळख , तसेच आधुनिक जगाशी कनेक्ट राहण्याकरीता अधिक फायदेशि आहे . तसेच आजकाल प्रत्येक क्षेत्रांमध्ये संगणकाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याने , प्रत्येक नोकरी ( खाजगी तसेच सरकारी ) नोकरीकरीता वरीलपैकी एक कोर्स अनिवार्य असणार आहेत .

स्पोकन इंग्लिश कोर्सेस : इयत्ता 10 वी नंतर सहसा विद्यार्थ्यांना बराच कालावधी मिळत असतो , या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना आपल्या इंग्लिशची कौशल्य वाढविण्यासाठी स्पोकन इंग्लिश कोर्स लावावेत , जेणेकरुन आपल्याला पुढील उच्च शिक्षणासाठी अधिक फायदेशिर ठरणार आहे .

टॅली / टायपिंग कोर्सेस : आपण जर वाणिज्य क्षेत्रांमध्ये करीयर करायची इच्छा असेल तर टॅली हा कोर्स करावेत , जेणेकरुन आपणांस वाणिज्य क्षेत्रांमध्ये जॉबची संधी उपलब्ध होईल .तसेच आजकाल सर्वच क्षेत्रांमध्ये टायपिंग ची आवश्यक आहे , यामुळे 10 वी / 12 वी नंतर टायपिंग कोर्सेस पुर्ण करुन घ्यावेत . यांमध्ये शासकीय नोकरी करीता इंग्रजी 30 श.प्र.मि / इंग्रजी 40 श.प्र.मि व मराठी 30 श.प्र.मि अर्हता आवश्यक असते .

सीईटी / नीट : आपणांस जर भविष्यात अभियांत्रिकी व वैद्यकीय क्षेत्रांमध्ये करीयर करायचे असल्यास , आपणांस सीईटी / नीट परीक्षा द्यावी लागेल . यामुळे 12 वी विज्ञान शाखेतुन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी बारावीच्या नंतर सीईटी / नीट परीक्षेच्या तयारीसाठी ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने कोर्सेस लावू शकता किंवा वैयक्तिक रित्या तयारी करु शकता ..

कोडिंग / चित्रकला क्लासेस : आपण जर वेब डिझायनिंग तसेच चित्रकलांमध्ये करीयर घडवू इच्छित असाल तर , आपण इयत्ता 10 वी / 12 वी च्या नंतर कोडिंग तसेच चित्रकलेचे कोर्सेस लावु शकता .

Leave a Comment