@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ ajit pawar group & shinde group possible minister list ] : राज्याचे नवीन मंत्रिमंडळ लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन होणार आहे . यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व शिवसेना शिंदे गटातील ज्येष्ठ नेत्यांना पहिल्या यादीत कॅबिनेट मंत्रीपद मिळणार आहे , अशा संभाव्य नेत्यांची नावे सदर लेखांमध्ये जाणून घेवूयात .
शिवसेना शिंदे गटातील हे नेते घेणार मंत्रीपदाची शपथ : शिवसेना एकनाथ शिंदे गटातील एकनाथ शिंदे , शंभूराजे देसाई , दादा भुसे , गुलाबराव पाटील , संजय राठोड , अर्जुन खोतकर , उदय सामंत हे ज्येष्ठ नेते पहिले यादीत कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेणार असल्याची वृत्तानुसार स्पष्ट झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील हे ज्येष्ठ नेते घेणार मंत्रिपदाची शपथ : तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील अजित पवार , नरहरी झिरवाळ , धनंजय मुंडे , सुनील शेळके , छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते पहिल्या यादीत कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे .
दिनांक 05 डिसेंबर रोजी राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून , देवेंद्र फडणवीस हे शपथ घेणार आहेत . त्यांच्या शपथविधीला देशातील 19 मुख्यमंत्र्यांना आमंत्रण दिले आहेत . त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांना देखील शपथविधीचे आमंत्रण दिले गेले आहे .
महायुतीतील पक्षांना त्यांच्या संख्याबळानुसार मंत्रिपद दिले जाणार आहेत , यामुळे निश्चितच भारतीय जनता पार्टीकडे (BJP) संख्याबानुसार अधिक मंत्रीपद राहणार आहेत .
- राज्य कर्मचाऱ्यांना 3 वर्षातुन 10 दिवस मिळते या कामासाठी पगारी रजा ; जाणून घ्या वित्त विभागाचा शासन निर्णय !
- जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकरीता महत्वपुर्ण राजपत्र निर्गमित दि.18.07.2025
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय ; संसदेत दिली माहिती !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !