@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ teacher Recruitment in d.ed / B.ed candidate ] : स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळेमध्ये आता डीएड / बी.एड शैक्षणिक पात्रता धारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यात येणार असून , या संदर्भात राज्य शासनाच्या शा. शि. व क्रीडा विभाग मार्फत दि. 23 सप्टेंबर रोजी महत्त्वपूर्ण GR निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदरच्या निर्णयानुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 20 व त्यापेक्षा कमी पट असणाऱ्या शाळांमधील दोन शिक्षकांपैकी एका शिक्षकाची नियुक्ती ही सेवानिवृत्त शिक्षक अथवा डीएड / बीएड अहर्ता धारण करणाऱ्या बेरोजगार शिक्षक यांच्यामधून नियुक्ती देण्यात येणार आहे .
तसेच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 10 व त्यापेक्षा कमी विद्यार्थी पटसंख्या असणाऱ्या शाळांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या 02 शिक्षक यापैकी एका पदावर डीएड / बीएड पात्रता धारण करणाऱ्या बेरोजगार उमेदवारांची नियुक्ती ही सदर निर्णयांमध्ये देण्यात आलेल्या अटी व शर्तींच्या अधीन राहून नियुक्ती दिली जाणार आहे .
नियुक्ती देताना अटी शर्ती : सदर कंत्राटी तत्वावर बेरोजगार शिक्षकांची नियुक्ती देताना करार पद्धतीने नियुक्ती दिली जाईल , तसेच कोणत्याही संवर्गामध्ये सेवा समावेशन तसेच सामावून घेण्याचे हक्क सदर उमेदवारास लागू राहणार नाहीत . सदर उमेदवारांची नियुक्ती ही एका शैक्षणिक वर्षाकरिता देण्यात येईल , तर नियुक्ती ही आवश्यकतेनुसार दरवर्षी नूतनीकरण करता येईल .
सदर कंत्राटी तत्वावर नियुक्त शिक्षकास दरमहा 15 हजार रुपये मानधन दिले जाईल , यामध्ये इतर कोणत्याही भत्त्यांचा समावेश नसेल . तसेच सदर शिक्षकास शैक्षणिक वर्षांमध्ये 12 रजा अनुज्ञेय राहतील , तर त्या व्यतिरिक्त रजा ह्या विनावेतन केले जाईल . सदर नियुक्त शिक्षकांना कोणत्याही प्रकारचे इतर प्रशासकीय अधिकार नसणार आहेत , सदर उमेदवारांनी त्याबाबत हमीपत्र देणे बंधनकारक असेल.
सदर कंत्राटी शिक्षकांचे कामकाज समाधानकारक नसल्यास त्वरित सेवा समाप्त करण्यात येईल , तसेच ज्यावेळी सदर शाळेचे पटसंख्या ही 10 पेक्षा अधिक होईल , त्यावेळी सदर शाळेवर नियमित शिक्षक येईपर्यंत कंत्राटी शिक्षकाची नियुक्ती कायम राहील .
अधिक माहितीसाठी GR डाऊनलोड करा.
- शेअर मार्केटमध्ये तेजी कधी येणार ? जाणून घ्या मार्केट तज्ञ , मोतीवाल ओसवाल यांचे भविष्य !
- सरकारी कर्मचाऱ्यांना 40 दिवसांच्या अतिरिक्त वेतन बोनससह , वाढीव भत्ताचा लाभ !
- शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट ; मार्केट आणखीन घसरण्याचा अंदाज !
- राज्यात महायुती सरकार राबवित असणाऱ्या काही महत्त्वपूर्ण नवीन योजना ; सत्तांतर झाल्यास बंद पडण्याची भीती ..
- पुढील 48 तासात राज्यातील “या” जिह्यात , वाऱ्यासह पावसाची शक्यता !